29.6 C
Mumbai
Saturday, October 24, 2026
घरबिजनेसपरदेश प्रवास झाला स्वस्त! एअर इंडियाकडून इंधन अधिभारात मोठी कपात

परदेश प्रवास झाला स्वस्त! एअर इंडियाकडून इंधन अधिभारात मोठी कपात

हजारो आंतरराष्ट्रीय प्रवाशांना तिकीटदरात दिलासा

Google News Follow

विदेशात प्रवास करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. एअर इंडियाने आंतरराष्ट्रीय प्रवाशांना मोठा दिलासा देत निवडक परदेशी मार्गांवरील फ्यूल सरचार्ज (इंधन अधिभार) कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. १ जुलै २०२६ पासून लागू झालेल्या या निर्णयामुळे अमेरिका, कॅनडा, युरोप, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियासारख्या महत्त्वाच्या मार्गांवरील विमानप्रवासाचा खर्च कमी होणार आहे. त्यामुळे परदेशात शिक्षण, नोकरी, व्यवसाय किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या हजारो भारतीय प्रवाशांना थेट आर्थिक फायदा मिळणार आहे.

गेल्या काही महिन्यांत पश्चिम आशियातील तणावामुळे कच्च्या तेलाच्या आणि एव्हिएशन टर्बाइन फ्यूल (ATF) च्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. त्याचा परिणाम विमान कंपन्यांच्या परिचालन खर्चावर झाला आणि अनेक कंपन्यांनी फ्यूल सरचार्ज वाढवला होता. मात्र आता जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने एअर इंडियाने त्याचा लाभ थेट प्रवाशांना देण्याचा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा:
देशातील पहिल्या ग्रीनफिल्ड एकात्मिक रिफायनरी-पेट्रोकेमिकल संकुलाचे उद्घाटन

मालेगाव महानगरपालिकेच्या कमानीवर उर्दू नाव कशाला?

फ्रान्समध्ये ‘जून’ ठरला ८० वर्षातील सर्वात उष्ण महिना

भारतीय शेअर बाजारात कार्ल्सबर्गची मोठी एंट्री

नव्या दरांनुसार उत्तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासाठी प्रति तिकीट आकारला जाणारा फ्यूल सरचार्ज २८० डॉलरवरून २०० डॉलरपर्यंत कमी करण्यात आला आहे. तसेच युरोप आणि ब्रिटनसाठी हा अधिभार २०५ डॉलरवरून १२५ डॉलरपर्यंत खाली आणण्यात आला आहे. काही मार्गांवर जवळपास ३९ टक्क्यांपर्यंत कपात झाल्याने विमान तिकीटांच्या एकूण खर्चात लक्षणीय बचत होणार आहे.

सध्या ही सवलत केवळ निवडक लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी लागू करण्यात आली असून देशांतर्गत विमानसेवा किंवा इतर मार्गांवरील फ्यूल सरचार्जमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कंपनीने जागतिक इंधन बाजारातील परिस्थितीनुसार पुढील काळातही शुल्काचा आढावा घेत आवश्यक निर्णय घेतले जातील, असे स्पष्ट केले आहे.

विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, एव्हिएशन टर्बाइन फ्यूलचा विमान कंपन्यांच्या एकूण परिचालन खर्चात मोठा वाटा असतो. त्यामुळे इंधनाच्या किमती कमी झाल्यास त्याचा थेट परिणाम विमान तिकीटांच्या दरांवर होतो. एअर इंडियाच्या या निर्णयानंतर इतर विमान कंपन्याही फ्यूल सरचार्ज कमी करण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आगामी काळात परदेश प्रवास आणखी स्वस्त होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा