33 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरअर्थजगतएप्रिलमध्ये रेकॉर्ड ब्रेक जीएसटी संकलन

एप्रिलमध्ये रेकॉर्ड ब्रेक जीएसटी संकलन

Google News Follow

Related

मोदी सरकारने अंमलात आणलेल्या क्रांतिकारी अशा वस्तू आणि सेवा करांच्या बाबतीत पुन्हा एकदा रेकॉर्ड ब्रेक संकलन झाले आहे. एप्रिल २०२२ मध्ये एकत्रित जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवाकर महसूल संकलन १६७५४० कोटी रुपये इतके झाले आहे. यात सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा करापोटी ३३१५९ कोटी, एसजीएसटी अर्थात राज्य सरकारच्या वस्तू आणि सेवा करापोटी ४१७९३ कोटी, आयजीएसटी म्हणजेच एकात्मिक वस्तू आणि सेवा करापोटी ८१९३९ कोटी (माल आयातीवर संकलित केलेल्या रु. ३६,७०५ कोटींसह) आणि उपकर १०६४९ कोटी रुपये ( मालाच्या आयातीवर संकलित केलेल्या रु. ८५७ कोटींसह).यांचा समावेश आहे.

एप्रिल २०२२ मध्‍ये झालेले सकल जीएसटी संकलन हे आतापर्यंतचे सर्वाधिक जीएसटी महसूल संकलन आहे. त्या आधीच्या महिन्यात नोंदवण्यात आलेल्या १४२०९५ कोटी रुपये जीएसटी संकलनाच्या तुलनेत एप्रिल महिन्यातील जीएसटी संकलन २५००० हजार कोटी रुपयांनी अधिक आहे.

हे ही वाचा:

फर्स्ट क्लास लोकलचा प्रवास झाला स्वस्त

‘हुतात्मा स्मारक हे राजकीय विधानं करण्यासाठी नाही तर हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आहे’

हंबीर तू, रणवीर तू…चे नितेश राणेंनी केले प्रकाशन

पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्र दिनाच्या मराठीतून दिल्या शुभेच्छा

सरकारने समझोत्याच्या स्वरूपात आयजीएसटीमधून सीजीएसटीला ३३४२३ कोटी रुपये आणि सीजीएसटीला २६९६२ कोटी रुपये चुकते केले आहेत.

नियमित समझोत्यानंतर एप्रिल २०२२ मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल सीजीएसटीसाठी ६६५८२ कोटी रुपये आणि एसजीएसटी साठी ६८७५५ कोटी रुपये आहे.

एप्रिल २०२२ चा जीएसटी महसूल हा मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा २०% जास्त आहे.या महिन्यात, मालाच्या आयातीतून मिळणारा महसूल ३०% अधिक नोंदवण्यात आला. आणि देशांतर्गत व्यवहारातून मिळणारा महसूल (सेवांच्या आयातीसह) हा गेल्या वर्षी याच महिन्यात या स्रोतांमधून मिळालेल्या महसुलापेक्षा १७% अधिक आहे.

सकल जीएसटी संकलनाने प्रथमच १.५ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मार्च २०२२ मध्ये निर्माण एकूण ई-वे देयकांची संख्या ७.७ कोटी होती, जी फेब्रुवारी २०२२ मध्ये निर्माण झालेल्या ६.८ कोटी ई-वे देयकांपेक्षा १३% ने अधिक आहे,ही वाढ व्यावसायिक व्यवहार वेगाने पूर्वपदावर येत असल्याचे प्रतिबिंबित करते.

एप्रिल २०२१. मध्ये दाखल केलेल्या एकूण ९२ लाख विवरणपत्रांच्या तुलनेत. एप्रिल २०२२ मध्ये, जीएसटीआर- ३ बी मध्ये १.०६ कोटी जीएसटी विवरणपत्र भरण्यात आली त्यापैकी ९७ लाख विवरणपत्र मार्च २०२२ या महिन्याशी संबंधित आहेत

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा