31 C
Mumbai
Monday, May 9, 2022
घरअर्थजगतनव्या आयपीओची 'डेलिव्हरी' घराघरात!

नव्या आयपीओची ‘डेलिव्हरी’ घराघरात!

Related

सध्या आपल्या देशात अनेक कंपनीचे आयपीओची येत आहेत. नुकताच एलआयसीचा आतापर्यांतचा सर्वात मोठा आयपीओ आला. जो ४ मे रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला होता. आता सेबीकडून परवानगी मिळाल्यानंतर आणखी नऊ कंपन्या त्यांचा आयपीओ बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. त्यातील एका कंपनीचा आयपीओ ११ मे ला येतोय. ही कंपनी म्हणजे वितरण क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठ्या लॉजिस्टिक कंपन्यांनपैकी एक. डेलिव्हरी लिमिटेड असं या कंपनीचे नाव आहे.

जेव्हा पण आपण ऑनलाईन वस्तू अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वरून मागवतो तेव्हा जरुरी नसते जो वितरण करेल तो याच कंपनीचा असेल. वितरण कंपन्या ह्या वेगळ्या असतात अश्याच वितरण कंपन्यांनपैकी एक ही डेलिव्हरी कंपनी आहे. डेलिव्हरी ही एक भारतीय लॉजिस्टिक आणि ई-कॉमर्स पुरवठा करणारी कंपनी आहे, जी हरियाणामध्ये आहे. डेलिव्हरीची स्थापना मे २०११ मध्ये SSN Logistics Ltd म्हणून करण्यात आली होती. २०११ मध्ये साहिल बरुआ, मोहित टंडन, भावेश मंगलानी, सूरज सहारन आणि कपिल भारती यांनी या कंपनीची स्थापना केली. सुरवातीला ही कंपनी काही लोकल स्टोर्ससाठी डिलेव्हरी सेवा पुरवत होती. ज्यावेळी ही कंपनी स्टोर्ससाठी सेवा पुरवत होती तेव्हा भारतात ऑनलाईन शॉपिंग आणि ई कॉमर्स क्षेत्र वेगाने पसरत होते. त्यांनतर मग या कंपनीने सुद्धा ई-कॉमर्स कंपन्यांना लॉजिस्टिक सेवा देण्यास सुरवात केली. २०१९ मध्ये जेव्हा या कंपनीची मूल्य दीड अब्ज डॉलर होती तेव्हा ही कंपनी युनिकॉर्न बनली. युनिकॉर्न म्हणजे अश्या कंपन्या ज्या स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध न होता १०० कोटी मूल्यापर्यंत पोहोचतात. अश्या कंपन्यांचा समावेश युनिकॉर्न क्लब मध्ये होतो.

डेलिव्हरी कंपनीचे आजच्या घडीला जवळपास २३ हजार ग्राहक असून या कंपनीने ई कॉमर्स क्षेत्रातील २२ टक्के मार्केट व्यापला आहे. या कंपनीचं इक्विटी शेअर कॅपिटल ६४ कोटी २३ लाखाच्या घरात आहे. तर या कंपनीतील चार स्टेकहोल्डर्स त्यांचा जवळपास २ कोटी ५३ लाखांचा स्टेक विकणार आहेत. म्हणून या कंपनीचा आयपीओ येणार असून ही कंपनी स्टोक मार्केट मध्ये लिस्टेड होणार असल्याचे म्हटलं जातंय. तर डिसेंबर २०२१ पर्यंत या कंपनीचा संपूर्ण महसूल ४ हजार ९११ करोड होता. मात्र अजून ही कंपनी प्रॉफिट मेकिंग झालेली नाही. कारण या कंपनीची आता सुरुवात असून सुरुवातीला कोणत्याही कंपनीच्या इन्व्हेस्टमेंट त्यांच्या वाढीवर जास्त खर्च होते.

येणाऱ्या या आयपीओतून कंपनीचा ५ हजार २३५ करोडचा निधी उभारण्याचा प्रयत्न असणार आहे. यामध्ये ४ हजार कोटी रुपयांचे फ्रेश इश्यू असून ही रक्कम कंपनीच्या विकासासाठी वापरली जाणार आहे. तर उरलेली १ हजार २३५ कोटी रक्कम ही जे कंपनीतून स्टेक बाहेर काढत आहेत त्या स्टेकहोल्डर्सना मिळणार आहे. या कंपनीचा आयपीओ ११ मे रोजी खुला होईल आणि १३ मे पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला असणार आहे. आयपीओची किंमत ४६२ ते ४८७ या दरम्यान असून कर्मचाऱ्यांना २५ रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. तर या आयपीओत एका लॉटमध्ये ३० शेअर असणार आहेत म्हणजे जर या आयपीओत गुंतवणूक करायची असेल तर कमीत कमी १४ हजार ६१० रुपये गुंतवावे लागणार आहेत. आणि गुंतवणूकदार एका लॉटपासून पासून ते १३ लॉट पर्यंत या कंपनीचे आयपीओ घेऊ शकणार आहेत.

हे ही वाचा:

शिवसेनेची लिलावतीत दादागिरी; नर्सेस, डॉक्टर, वॉर्ड बॉयना धमकावले

सदावर्ते यांची नवी संघटना, ‘एसटी कष्टकरी जनसंघ’

शिवसेनेची लिलावतीत दादागिरी; नर्सेस, डॉक्टर, वॉर्ड बॉयना धमकावले

मुंबई-पुणे महामार्गावर अपघात, तीन मृत्यू

तर फॅब इंडिया, कॅपिलरी टेक्नॉलॉजीज, हर्षा इंजिनिअरिंग, इन्फिनॉन बायोफार्मा, अथर इंडस्ट्रीज, सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजी, एशियानेट सॅटेलाइट कम्युनिकेशन आणि सनातन टेक्सटाइल्स या आठ कंपन्यांचे लवकरच आयपीओ येणार आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,983चाहतेआवड दर्शवा
1,878अनुयायीअनुकरण करा
9,020सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा