29 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरअर्थजगतLIC SHARE का गडगडतोय ?

LIC SHARE का गडगडतोय ?

Google News Follow

Related

आतापर्यंतचा देशातील सर्वात मोठा आणि जगातील सर्वात तिसरा मोठा आयपीओ आला. आयपीओ येण्याच्या आधी या आयपीओची बरीच चर्चा सुरु होती. सर्वसामान्यांपासून ते मोठमोठ्या गुंतवणूकदारांपर्यंत सर्वच या आयपीओसाठी उत्सुक होते मात्र शेअर मार्केटमध्ये लिस्टेड झाला आणि या आयपीओने सर्वाना निराश केलं.

मोठा गाजावाजा करत एलआयसीचा आयपीओ बाजारात आला. हा आयपीओ चांगली कामगिरी करेल अशी शेअर बाजारात सर्वांनाच अपेक्षा होती. त्याच अपेक्षेवर शेअर बाजारातल्या गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात एलआयसीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक केली. बाजारात आल्यापासून हा शेअर सातत्यानं घसरत असल्याचं पाहायला मिळतंय. एलआयसीचे मार्केट कॅप सहा लाख कोटींवरून सुमारे ४ लाख ५७ हजार कोटींवर घसरलंय, याचा अर्थ एलआयसी गुंतवणूकदारांनी एलआयसी शेअर लिस्टेड झाल्यापासून एका महिन्याच्या आत १ लाख ४३ हजार कोटी रुपये गमावलेत. आणि अँकर गुंतवणूकदारांनी त्यांचा भाग विकलाय त्यामुळे एलआयसीचा शेअर ६७० रुपयाच्या खाली ट्रेड करतोय.

अनेक महिन्यांपासून एलआयसीचा आयपीओ येणार अशी चर्चा सुरु होती अनेक महिने गुंतवणूकदार एलआयसीच्या आयपीओची वाट बघत होते. अखेर मे महिन्याच्या सुरुवातीला एलआयसीच्या आयपीओ आला. त्यावेळी एलआयसी आयपीओ आतापर्यंतचा देशातील सर्वात मोठा आयपीओ ठरला तर जगातील सर्वात मोठा तिसरा आयपीओ ठरला. सरकारने एलआयसीचे साडेतीन टक्के स्टेक विकले. त्यांनतर ऑफर जवळजवळ तीन वेळा ओव्हरसबस्क्राइब झाली. अनेक पॉलिसीधारकांनी नवीन डिमॅट खाती उघडून या आयपीओसाठी अर्ज केला होता. १७ मे रोजी एलआयसी शेअर मार्केटमध्ये लिस्टेड झाला. आणि तो मायनसमध्ये म्हणजेच ८७२ ला शेअरमार्केटमध्ये खुला झाला. तेव्हापासून बाजारात हा शेअर सातत्यानं घसरत असल्याचं पाहायला मिळतंय फक्त ३ ते ४ वेळा थोडा प्रॉफिटमध्ये होता. जेव्हा एलआयसीचा आयपीओ आला तेव्हा एलआयसी ही भारतातील पाचवी लिस्टेड कंपनी होती मात्र आताच्या या स्थितीमुळे पाचव्या नंबरवरून एलआयसी सातव्या नंबरवर आलीय. एलआयसी आयपीओच्या प्राइज बँडच्या तुलनेत २४ ते २५ टक्के घट झालीय.

१३ जूनला एलआयसीच्या अँकर गुंतवणूकदारांचा एक महिन्याचा लॉक इन कालावधी संपला. त्यामुळे एलआयसीचे शेअर आणखी कोसळलेत ६७० रुपयाच्या खाली सध्या एलआयसीचे शेअर ट्रेड करत आहे. अँकर गुंतवणूकदार म्हणजे ते संस्थात्मक गुंतवणूकदार असतात ज्यांना आयपीओ उघडण्यापूर्वी शेअर्सचे वाटप केले जाते परंतु त्यांना त्यांचे शेअर्स कंपनी शेअर बाजारात लिस्टेड झाल्यानंतर ठराविक कालावधीनंतर काढावे लागतात. एलआयसी आयपीओ येण्याआधी एलआयसीने २ मे रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी ५ पूर्णांक ९३ कोटी शेअर्स जाहीर केले होते. १२३ अँकर गुंतवणूकदारांनी एलआयसीमध्ये ५ हजार ६२७ कोटी रुपये गुंतवले होते. यात आयसीआयसीआय प्रूडेंशिअल लाइफ इन्सुरन्स, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, कोटक महिंद्रा लाइफ इन्शुरन्ससह अनेकांचा समावेश आहे.

एलआयसीचा लॉस होण्याची कारण अनेक सांगितली जातंय त्यापैकी एलआयसीचं जेव्हा लिस्टिंग झालं होत म्हणजे जेव्हा एलआयसी मार्केटमध्ये आलं तेव्हा आणि आतापण आपला महागाईचा दर जास्त आहे. महागाईचा दर वाढल्याने अनेक वस्तूंचा भाव वाढलाय. त्यामुळे असं म्हटलं जातंय की एलआयसीच्या लिस्टिंगची वेळ चुकलीय. अजून एक कारण म्हणजे रशिया युक्रेन युद्धाचा शेअर मार्केटवर होत असलेल्या परिणाम आणि आपल्या शेजारील देश श्रीलंका सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करतोय हेही मोठं कारण असल्याच म्हटलं जात. तर एलआयसीने काही दिवसांपूर्वीच मार्च २०२२ तिमाहीचा निकाल जाहीर केला होता. त्यावेळी कंपनीचा मार्च तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा १७ टक्क्यांनी घसरून २ हजार ४१० कोटी रुपयांवर आलाय. काही लोक यालाही एलआयसीच्या नुकसानीच कारण मानताहेत. मात्र या काळात एलआयसीचा निव्वळ प्रीमियम वाढला आणि तो १७ पूर्णांक ९ टक्क्यांनी वाढून १ लाख ४० हजार कोटी रुपये झालाय.

हे ही वाचा:

अनिल परब ईडी चौकशीसाठी गैरहजर

१८ तास चौकशीनंतर राहुल गांधींची आज पुन्हा चौकशी

आयपीएल मीडिया राईट्सच्या लिलावातून बीसीसीआयने कमावले इतके रुपये

संत तुकाराम शिळामंदिर हे भक्ती आणि ज्ञानाचा आधार

एलआयसीच्या आयपीओबाबत बाजार तज्ज्ञांनी एक महिन्यापूर्वीच यात गुंतवणूक करायची असेल तर ती दीर्घकाळासाठी करावी लागेल असा सल्ला दिला होता. एलआयसीचा हा आयपीओ बाजारात उसळी घेईल मात्र त्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागेल असं बाजारातल्या तज्ज्ञांनी महिन्याभरापूर्वीच सांगितलं होतं. आज भलेही काही तज्ज्ञ या आयपीओपासून तूर्तास लांब राहाण्याचा सल्ला देताना पाहायला मिळत असले तरी ज्या गुंतवणूकदारांनी या आयपीओमध्ये पैसे गुंतवले आहेत त्यांना आजही हे पैसे दीर्घ कालावधीत चांगला नफा देणार असल्याच्या मुद्द्यावर तज्ज्ञ ठाम आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा