बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये सूचीबद्ध असलेली स्टार हाऊसिंग फायनान्स लि. कंपनी आता नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये आपल्या नोंदणीसाठी प्रयत्नशील आहे. स्टार हाऊसिंग फायनान्स लि. ही कंपनी विविध राज्यात विस्तारली असून घरांसाठीच्या किरकोळ कर्जपुरवठा क्षेत्रात कार्यरत आहे. आता या कंपनीने राष्ट्रीय स्तरावर झेप घेण्याचे ठरविले असून नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये त्यांची नोंदणी झाल्यास तिथेही या कंपनीचे समभाग खरेदी-विक्रीस उपलब्ध होऊ शकतील.
स्टार हाऊसिंग फायनान्स लि. ही कंपनी सध्या बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये आधीच सूचीबद्ध आहे. निमशहरी आणि ग्रामीण भागात अल्प उत्पन्न गटात तसेच मध्यम वर्गांच्या घरांच्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी कर्जपुरवठा करण्याचे काम ही कंपनी करते. या कंपनीने गेल्या काही वर्षांत आपल्या कामगिरीची जबरदस्त छाप पाडली आहे.
हे ही वाचा:
खो खोचा श्वास थांबला!, अनिल गोखले यांचे निधन
अमेरिकन डॉक्टरकडे आढळला भारतात बंदी असलेला सॅटेलाइट फोन
हैदराबादमध्ये बॉम्बस्फोटाचा कट उधळला; आयसिसशी संबंधित दोघांना अटक
यासंदर्भात स्टार हाउसिंग फायनान्स कंपनीचे सीईओ कल्पेश दवे म्हणाले की, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये नोंदणी करून आम्ही आमच्या गुंतवणूकदारांची व्याप्ती वाढविण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच आमचा दृष्टिकोनही अधिक व्यापक करणार आहोत. आमच्या गुंतवणूकदारांसाठी आम्ही अधिक सुलभता आणण्याचा प्रयत्नही करणार आहोत. दवे म्हणाले की, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये नोंदणी झाल्यानंतर शेअर मार्केटमधील आमच्या अस्तित्वाला आणखी बळ मिळेल, तसेच या माध्यमातून भांडवली बाजारात प्रवेश करण्याच्या अधिक संधी उपलब्ध होतील. वित्तपुरवठ्याचे अधिक सक्षम आणि सर्वसमावेशक असे व्यासपीठही आम्ही उभे करू शकू.
या नोंदणीप्रक्रियेसाठी जी पावले कंपनी उचलणार आहे, त्याची माहिती वेळोवेळी गुंतवणूकदारांना दिली जाणार आहे.
स्टार हाऊसिंग कंपनीविषयी
स्टार हाऊसिंह फायनान्स कंपनीने सुरुवातीपासून अल्पदरातील घरांसाठी वित्तपुरवठा केलेला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तसेच अल्प उत्पन्न गटांतील लोकांना घरांसाठी कर्जपुरवठा करणारी कंपनी आहे. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, एनसीआर, तामिळनाडूत या कंपनीने आपला पसारा वाढविला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या घरांसाठी आघाडीची कर्जपुरवठा करणारी ही कंपनी आहे. मुंबईत या कंपनीचे मुख्य कार्यालय आहे.
