28.5 C
Mumbai
Saturday, June 27, 2026
घरक्राईमनामाआत्महत्या केलेल्या तरुणीच्या बॅगमध्ये सापडला आयफोन आणि बिंग फुटले

आत्महत्या केलेल्या तरुणीच्या बॅगमध्ये सापडला आयफोन आणि बिंग फुटले

संगीत शिक्षकाविरोधात ब्लॅकमेल, लैंगिक शोषणाचा उलगडा

Google News Follow

Related

१८ वर्षीय तरुणीच्या आत्महत्येनंतर तब्बल चार महिन्यांनी तिच्या सामानात सापडलेल्या एका विसरलेल्या आयफोनमुळे धक्कादायक माहिती समोर आली आहे. या नव्या पुराव्याच्या आधारे कस्तुरबा मार्ग पोलिसांनी बोरिवलीतील २३ वर्षीय संगीत शिक्षकाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, पॉक्सो कायद्यांतर्गत लैंगिक शोषण, खंडणी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ फेब्रुवारी रोजी संबंधित तरुणीने राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्यावेळी अपघाती मृत्यूची (एडीआर) नोंद करण्यात आली होती. मात्र, चार महिन्यांनंतर तिच्या आईला मुलीच्या सामानात दुसरा मोबाईल फोन, आयफोन प्रो मॅक्स, सापडला. मुलीच्या मृत्यूमागील कारणांचा काही सुगावा मिळतो का, या संशयातून त्यांनी एका नातेवाईकाच्या मदतीने फोन तपासला.
हे ही वाचा:
४ महिन्यांनंतर पुन्हा सुरू झाला सौदीचा तेलपुरवठा

सनातन मूल्यांचा गैरफायदा घेणाऱ्यांना, श्रद्धेचा खेळ खेळणाऱ्यांना क्षमा नाही!

सिया दोषी असेल तर मृत्युदंडाची शिक्षा द्या!

तेलंगणातील महसूल विभाग महिला अधिकाऱ्याकडे सापडली २० कोटींची संपत्ती

फोनमधील तपासणीत काही खासगी व्हिडिओ आणि छायाचित्रे आढळून आल्याचा दावा कुटुंबाने केला आहे. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे नव्याने तक्रार दाखल करत गंभीर आरोप केले. तक्रारीनुसार, आरोपी तरुणी अल्पवयीन असतानापासून तिच्याशी संबंधात होता. त्याने अनेक वर्षे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले, खासगी क्षणांचे गुप्त चित्रीकरण केले आणि त्याच व्हिडिओंच्या आधारे तिचे भावनिक शोषण व ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे.

याशिवाय आरोपीने तरुणीकडून पैसे आणि दागिने उकळल्याचा तसेच तिचे आर्थिक शोषण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याशी संबंध ठेवले, मात्र ती सज्ञान झाल्यानंतर लग्नास नकार दिल्यामुळे ती मानसिकदृष्ट्या खचल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या सततच्या ब्लॅकमेल, शोषण आणि नकारामुळेच तिने अखेर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

या प्रकरणातील व्हिडिओ, छायाचित्रे आणि डिजिटल पुराव्यांची सत्यता पडताळण्यासाठी पोलिसांकडून मोबाईलचे फॉरेन्सिक विश्लेषण करण्यात येणार आहे. तसेच डिलीट केलेला डेटा, डिजिटल संवाद आणि आर्थिक व्यवहारांचीही तपासणी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ६९, १०८, ३०८, ३१६(२) व ३१८(४), माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७(ई) तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम ४, ८ आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
318,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा