26 C
Mumbai
Friday, February 6, 2026
घरक्राईमनामाछत्तीसगड-ओडिशा सीमेवर १६ नक्षलवाद्यांचा खात्मा; एक कोटींचे बक्षीस असलेला चलपती ठार

छत्तीसगड-ओडिशा सीमेवर १६ नक्षलवाद्यांचा खात्मा; एक कोटींचे बक्षीस असलेला चलपती ठार

३६ तासांपासून सुरू आहे मोहीम; शस्त्रसाठाही जप्त

Google News Follow

Related

छत्तीसगड- ओडिशा सीमेवरील गरियाबंद जिल्ह्यात सुरक्षा दला आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरू असल्याची माहिती आहे. या चकमकीत आतापर्यंत १६ नक्षलवादी ठार झाल्याची माहिती समोर आली असून अद्याप ही चकमक सुरू आहे. या मोहिमेदरम्यान मोठा शस्त्र साठा जप्त करण्यात आला आहे. सुरक्षा दलाचे सुमारे एक हजार जवानांनी या मोहिमेत सहभागी आहेत.

छत्तीसगडमधील गरियाबंद येथे कुऱ्हाडी घाटच्या भालुदिग्गीच्या डोंगरावर काल सकाळपासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. माहितीनुसार, गेल्या ३६ तासांपासून जवानांचा जंगलात नक्षलवाद्यांशी सामना सुरू आहे. आतापर्यंत एकूण १६ नक्षलवादी ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, एक कोटी रुपयांचं बक्षीस असलेला जहाल माओवादी चलपती ठार झाला आहे. ओडिशा राज्यातील स्टेट कमिटीचा चीफ म्हणून नक्षलवादी संघटनेमध्ये तो पदावर होता. चलपती हा जवळपास ३० वर्षांपासून नक्षल चळवळीत सहभागी होता.

चकमकीनंतर घेण्यात आलेल्या झडती दरम्यान काल दोन नक्षलवाद्यांचे (एक महिला, एक पुरुष) मृतदेह सापडले. यावेळी जखमी जवानाला एअरलिफ्ट करून रायपूरला आणण्यात आले. छत्तीसगड आणि ओरिसा सुरक्षा दलाच्या एकूण १० तुकड्या नक्षलवाद्यांविरोधात ऑपरेशन करत आहेत. ठार झालेल्या नक्षलवाद्यांच्या मृतदेहांची सध्या ओळख पटवली जात आहे.

ओडिशा आणि छत्तीसगड सीमेवरील कुल्हारी घाटाच्या जंगलात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर ओडिशा आणि छत्तीसगड पोलिसांनी मिळून नक्षलवाद्यांविरोधात संयुक्त कारवाई सुरू केली. कुऱ्हाडी घाट राखीव जंगलातील घनदाट जंगलात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे.

हे ही वाचा:

ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात दिसले भारताचे महत्त्व; जयशंकर यांना पहिल्या रांगेत बसण्याचा मान

मुस्तफा काग्गा टोळीच्या चार गुंडांचा उत्तर प्रदेश एसटीएफकडून खात्मा

मुंबई सेंट्रलला रेल्वे पोलिसांनी पकडला ‘पुष्पा’

परशुराम हिंदू सेवा संघाची राज्य कार्यकारणी बैठक उत्साहात संपन्न

दरम्यान, केंद्र सरकारने ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातील नक्षलवाद संपवण्याची शपथ घेतली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये अजेंडा आजतक येथे आपल्या भाषणात गृहमंत्री अमित शाह म्हणाले, छत्तीसगडमधील फक्त दोन जिल्हे नक्षल प्रभावाखाली आहेत. आणि ते ३१ मार्च २०२३ पर्यंत मुक्त केले जातील.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा