दिल्ली पोलिसांनी औचंडी परिसरातून १३ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे. हे सर्व बांगलादेशी दोन वर्षांपूर्वी बेकायदेशीरपणे देशात घुसले होते. तेव्हापासून ते वेगवेगळ्या भागात मजूर म्हणून काम करत होते. दिल्ली पोलिसांनी सांगितले, पोलिसांनी घुसखोरांविरुद्ध कडक कारवाई सुरु केल्यापासून ते लपून राहण्याचा प्रयत्न करत आहेत. गुप्त माहितीच्या आधारे त्यांना अटक करण्यात आली आणि परदेशी नोंदणी कार्यालयात (FRRO) सोपवण्यात आले. इथून पुढे त्यांना बांगलादेशला पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मोहम्मद रफीकुल, पत्नी खोतेजा बेगम, मोहम्मद अन्वर हुसेन, पत्नी झोरिना बेगम, मोहम्मद सईद, मोहम्मद अमीनुल इस्लाम, पत्नी अफरोजा खातून, मोहम्मद नफुसे, मोहम्मद खाखॉन वार मोहम्मद रफीकुल, मोहम्मद खाखोनची पत्नी हसना, अशी अटक केलेल्या बांगलादेशी घुसखोरांची नावे असून त्यांच्यासोबत ५ अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.
पोलिस चौकशीदरम्यान, आरोपींनी सांगितले की, जलील नावाच्या व्यक्तीने बांगलादेशहून दिल्लीला आणण्यात मदत केली होती. तो देखील बांगलादेशचा रहिवासी आहे. जलीलच्या सल्ल्यानुसार, तो प्रथम बसने भारत-बांगलादेश सीमेवर आला. तिथून त्यांना अशा ठिकाणी नेण्यात आले जिथून ते सहजपणे भारतात प्रवेश करू शकत होते. यानंतर आम्ही ऑटो घेतला आणि कूचबिहारला पोहोचलो. तिथून, जलीलने रेल्वे स्टेशनवरून दिल्लीला जाण्यासाठी सर्वांसाठी तिकिटे बुक केली आणि तो बांगलादेशला परतला. अशा प्रकारे १३ जण दिल्लीत पोहोचले.
हे ही वाचा :
‘चिकन्स नेक’ जवळील बांगलादेशातील विमानतळ चीन विकसित करणार?
भाजपा आमदार रवींद्र सिंह नेगी यांनी बेटिंग सेंटरवर चालवला बुलडोझर!
संजय राऊतांनी पूर्ण पुस्तक लिहिलं तर उद्धव ठाकरे त्यांना नरकात पाठवतील!
‘पाकिस्तानच्या भोलारी एअर बेसवर चार ब्रह्मोस पडली, AWACS विमान मोडून पडलं!’
पोलिसांनी सांगितले, सुरवातीला हरियाणात वीट भट्टीवर काम केल्यानंतर ते दिल्लीला आले आणि मजूर म्हणून काम करू लागले. १३ मे रोजी या घुसखोरांविषयी पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस पथकाने सापळा रचला आणि औचंडी गावातून १३ बेकायदेशीर बांगलादेशी लोकांना पकडले. चौकशीदरम्यान त्यांनी कबूल केले की ते बांगलादेशाचे आहेत आणि भारतीय कोणतीही कागदपत्रे नाहीत. हे सर्व लोक बांगलादेशातील खुदीग्राम जिल्ह्यातील खुसावली गावातील रहिवासी आहेत. या प्रकरणी पोलिसांची पुढील कारवाई सुरु आहे.
🚨 MAJOR SUCCESS | Delhi Police Crime Branch 🚨
13 illegal Bangladeshi immigrants caught in a precision raid at Village Auchandi, Delhi! 🔥🛂Highlights:
• Swift Operation by NDR/Crime Branch
• Pinpoint Intelligence & flawless execution
• Zero Tolerance for illegal… pic.twitter.com/jawV5gsjZC— Crime Branch Delhi Police (@CrimeBranchDP) May 16, 2025
