मुंबई पोलिस दलाच्या विशेष शाखेला सह पोलीस आयुक्त ( अप्पर पोलीस महानिरीक्षण) दर्जाचा अधिकारी लाभणार आहे, त्याच बरोबर विशेष शाखेत गुप्तवार्ता विभाग नव्याने करण्यात येणार आहे. विशेष शाखेला सह पोलीस आयुक्त दर्जाचा अधिकारी दिल्यानंतर मुंबई पोलीस दलात ५ ऐवजी ६ सहपोलिस आयुक्त असतील. यापूर्वी विशेष शाखेच्या प्रमुखपदी अप्पर पोलीस आयुक्त पदाचे अधिकारी होते हे पद अपग्रेट करून सह पोलीस आयुक्त यांच्याकडे विशेष शाखेची धुरा देण्यात येणार आहे.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून महत्वाचे शहर आहे. मुंबई शहरातील गुप्तवार्ता यंत्रणेचे बळकटीकरण करणे व प्राप्त गुप्तवार्ताचे निरंतर सुक्ष्म पर्यवेक्षण करणे आवश्यक आहे. मुंबई शहरात महत्वाची स्थळे खूप जास्त असून त्यातही “अ” वर्गवारीतील महत्वाच्या स्थळांची संख्या मोठी आहे.
सदर स्थळांची सुरक्षा व्यवस्था अभेद्य राखणे व तिचे सुक्ष्म पर्यवेक्षण करणे आवश्यक आहे. मुंबई शहरात सुरक्षिततेचा धोका जास्त आहे, तसेच शहरात अतिमहत्वाच्या व्यक्तींची संख्या खूप मोठी आहे. तसेच भारताचे व इतर राष्ट्रांचे राष्ट्रपती, उप राष्ट्रपती, पंतप्रधान, राष्ट्रप्रमुख, राजे, देशातील इतर महत्वाचे केंद्रीय मंत्री यांच्या मुंबई शहरास होणाऱ्या भेटींची संख्या देखील मोठी आहे.
त्यांच्या अशा प्रत्येक मुंबई भेटीदरम्यान त्यांचा होणारा मुंबई शहर व आजूबाजूच्या परिसरातील प्रवास व वास्तव्य या दरम्यान त्यांच्या सुरक्षेचे बळकटीकरण करणे व सुक्ष्म पर्यवेक्षण करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या अधिपत्याखाली “पोलीस सह आयुक्त, गुप्तवार्ता (Joint Commissioner of Police, Intelligence)” हे पद सुनिश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा :
दिल्लीत १३ बांगलादेशी घुसखोरांना अटक!
‘चिकन्स नेक’ जवळील बांगलादेशातील विमानतळ चीन विकसित करणार?
भाजपा आमदार रवींद्र सिंह नेगी यांनी बेटिंग सेंटरवर चालवला बुलडोझर!
‘पाकिस्तानच्या भोलारी एअर बेसवर चार ब्रह्मोस पडली, AWACS विमान मोडून पडलं!’
