मी काहीतरी स्फोटात्मक लिहिलंय, बोललोय आणि ते सत्य माना, असे प्रकार प्रसिद्धीसाठी असतात हि सर्व स्टंटबाजी, नौटंकी आहे. शिवसेना प्रमुखांनी अनेकांना मदत केली आहे. म्हणून अनेकांचे त्यांच्यावर प्रेम आहे. यांच्यामुळे (संजय राऊत) शिवसेना प्रमुख मोठे झाले नाहीत. तर त्यांच्या सावलीत वाढलेली ही लोक आहेत. त्यामुळे त्यांचे ते पुस्तक आहे ते चित्रपटाच्या स्क्रिप्ट सारखे आहे, स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा हा प्रकार आहे, असा टोला शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी उबाठा खासदार संजय राऊत यांना लगावला.
‘नरकातला स्वर्ग’ नावाचे संजय राऊत यांचे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. या पुस्तकात त्यांनी मोठे दावे केले आहेत. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शाह यांना शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मदत केली, असा दावा संजय राऊत यांनी आपल्या ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकात केला आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या पुस्तकातील दाव्यांवर शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आणि टीका केली.
हे ही वाचा :
“पाकचे दहशतवादाशी संबंध उघड झाल्यानंतर निधी देणं मोठी चूक”
पाकला भरणार धडकी; लष्करी ताकदीच्या बळकटीकरणासाठी ५० हजार कोटी
इराकी जहाजाच्या क्रूमधील पाकिस्तानी नागरिकाला कारवार बंदरात प्रवेश नाकारला
“इंडी आघाडीचे भविष्य उज्ज्वल दिसत नाही…” काँग्रेस नेते चिदंबरम असं का म्हणाले?
नरेंद्र मोदींना शरद पवारांनी केलेल्या मदतीच्या दाव्यावर शिरसाट म्हणाले, राजकारणामध्ये अशा गोष्टी सांगून केल्या जात नाहीत. शिवसेना मुंबईत वाढण्यामध्ये कारणीभूत कोण होते? के कधी कोणी सांगितले नाही. शरद पवार कोणाशी बोलले?, त्यांनी विरोध का केला? नरेंद्र मोदींना का वाचवले?, या सर्व गोष्टी शरद पवारांनी सांगितले तर त्याला महत्व आहे. (संजय राऊत) तुम्ही ही दलाली कशाला करताय, तुम्हाला हे कोणी सांगितले. शरद पवारांचे एकूण तुम्हाला खरे वाटत असेल तर त्यांच्या तोंडून ते यायला हवे.
नरेंद्र मोदींनी शरद पवारांना मदत केली, शरद पवारांनी नरेंद्र मोदींना मदत केली. शरद पवारांचे बोट धरून राजकारणात आलो हे नरेंद्र मोदी जाहीर सभेत बोलले आहेत. मग तुम्ही कोण सांगणारे?, असा सवाल संजय शिरसाट यांनी उपस्थित केला.
