30 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
घरक्राईमनामारेल्वेत मिळाला २ लाखांचा फोन, त्याने विकला ३५०० रुपयांना...

रेल्वेत मिळाला २ लाखांचा फोन, त्याने विकला ३५०० रुपयांना…

एक महिला फोन विसरून गेली होती पण तक्रारीनंतर पोलिसांनी शिताफीने केली अटक

Google News Follow

Related

सीसीटीव्हीमध्ये आढळलेल्या चपलेवरून रेल्वे पोलिसांनी चोरी गेलेल्या दोन लाखांच्या फोनचा माग काढला आहे. सेंट्रल रेल्वेमध्ये काम करणारी ही महिला २४ मे रोजी रेल्वेच्या फर्स्ट क्लासच्या डब्यात बसली असताना तिने तिचा दोन लाखांचा फोन सीटवर ठेवला होता. मात्र छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे उतरत असताना तिच्या लक्षात आले की, तिचा फोन तिच्याजवळ नाही. जेव्हा ती पुन्हा डब्यात शिरली, तेव्हा तिला तिच्या सीटवर तिचा फोन आढळला नाही. त्यानंतर २५ मे रोजी तिने सीएसएमटी येथील रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.

रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळाच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्हीने संशयितांना कैद केले होते. मात्र त्यांचे चित्रण धूसर होते. मात्र पोलिसांनी आणखी जवळून संशयितांना पाहिले. त्यांच्या चालण्याच्या पद्धतीचे बारकाईने निरीक्षण केले असता त्यांना संशयितांची चप्पल अंगठ्याच्या इथे तुटल्याचे आढळले. त्यामुळे त्या चोराची चाल बदलली होती.

त्यानंतर पोलिसांनी त्यादृष्टीने आणखी तपास करून ट्रेनमधून फोन उचलणाऱ्या चोरांच्या मुसक्या आवळल्या. या फोनची खरी किंमत माहीत नसल्याने आरोपी हेमराज बन्सिवाल (३०) याने तो फोन अवघ्या साडेतीन हजारांना विकला होता. अर्थात, हा फोन विकत घेणारा देविलाल चौहान (३२) यालाही रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.

हे ही वाचा:

आमदार भातखळकरांच्या प्रयत्नांमुळे कांदिवली स्थानकातला सरकता जिना होणार सुरू

ताडोबात ‘वीरा’ वाघिणीने दिला दोन बछड्यांना जन्म

राहुल गांधी यांनी दुसऱ्या दिवशीही अमेरिकेत मदतीसाठी पदर पसरला

मान्सून बंगालच्या उपसागरात, मुंबईत यायला विलंब होणार?

पकडण्याच आलेला चोर बन्सीवाल याने पोलिसांना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून मी एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जात होतो. जेव्हा महिलांच्या डब्यातून आपण जात होतो तेव्हा तिथे एका सीटवर फोन दिसला. बन्सीवाल हा कुर्ला येथे टीशर्ट विकतो. त्याला आपल्या घराच्या भाड्यासाठी आणि अन्नधान्यासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे त्याने चौहानला फोन विकला. चौहान हा चर्मकार आहे. त्याने तो फोन विकत घेतला पण त्याला त्याची मूळ किंमतही माहीत नव्हती किंवा तो कसा वापरायचा याचीही माहिती नव्हती. शेवटी पोलिसांना तो फोन त्याच्याकडून हस्तगत करता आला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा