27.7 C
Mumbai
Saturday, August 1, 2026
घरक्राईमनामाजंतर मंतर आंदोलनात २८७३ गुन्हेगार

जंतर मंतर आंदोलनात २८७३ गुन्हेगार

दिल्ली पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने चेहरे ओळखले

Google News Follow

Related

दिल्लीतील जंतर-मंतर येथे २० ते २५ जुलैदरम्यान झालेल्या विद्यार्थी आंदोलनात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या २,८७३ व्यक्ती उपस्थित होत्या, असा दावा करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या सूत्राच्या हवाल्याने यासंदर्भात माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, चेहरा ओळख प्रणाली (Face Recognition System – FRS) आणि इतर तांत्रिक साधनांच्या मदतीने या व्यक्तींची ओळख पटविण्यात आली.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ओळख पटलेल्या बहुतांश व्यक्ती उत्तर-पूर्व दिल्लीतील सीलमपूर, चांदबाग, जाफराबाद तसेच दक्षिण-पूर्व दिल्लीतील जामिया नगर, शाहीन बाग आणि ओखला परिसरातील एफआरएस कॅमेऱ्यांमध्ये यापूर्वी नोंदल्या गेल्या होत्या. या व्यक्तींचा २० जुलै रोजी जंतर-मंतर आणि नवी दिल्लीतील इतर भागांत झालेल्या हिंसाचाराशी काही संबंध आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, या व्यक्तींवर लैंगिक अत्याचार, खून, अल्पवयीनांवरील अत्याचार (POCSO), अपहरण आणि दरोडा यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यापैकी काही संशयित वारंवार कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या आंदोलनस्थळी परत आल्याचेही पोलिसांनी सांगितले. या व्यक्तींविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

गुन्हेगारी नोंद असलेल्या २,८७३ आंदोलनकर्त्यांपैकी किमान ९८९ जण गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचा संशय असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दिल्ली पोलिसांची एफआरएस (Face Recognition System) ही अत्याधुनिक प्रणाली असून, जंतर-मंतर आंदोलनस्थळाच्या प्रवेश आणि निर्गमन मार्गांवर तसेच शहरातील विविध ठिकाणी, सीमावर्ती प्रवेशद्वारांसह, उच्च-रिझोल्यूशन कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांचा उद्देश समाजविघातक घटकांवर लक्ष ठेवणे आणि आंदोलनकर्त्यांच्या वेशात अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न रोखणे हा असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

अमरनाथ यात्रेवरून परतणारी बस गांदरबलमध्ये उलटली

उमर खालिद, शर्जील इमामच्या समर्थनार्थ फलक; महिलेविरोधात एफआयआर

जंतर-मंतरवरील आंदोलनाला परवानगी होती, संसद मोर्चाला नाही

“अल्लाहने आदेश दिला” म्हणत तीन महिलांवर चाकूहल्ला

एफआरएस कॅमेऱ्यांमधून मिळालेली छायाचित्रे दिल्ली पोलिसांच्या डेटाबेसमध्ये पाठवली जातात. या डेटाबेसमध्ये विविध पोलीस ठाण्यांमध्ये नोंद असलेल्या गुन्हेगार, फरार आरोपी, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्ती आणि सराईत गुन्हेगारांची माहिती उपलब्ध आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
325,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा