30 C
Mumbai
Sunday, October 2, 2022
घरक्राईमनामाचार चाकी गाड्या चोरणारा चोर श्रीमंत; तीन बायका, सात अपत्ये

चार चाकी गाड्या चोरणारा चोर श्रीमंत; तीन बायका, सात अपत्ये

देशातील सर्वात मोठा अट्टल चोर, दहशतवादी, की तस्कर ?

Related

गाडी चोरणारे चोर फार-फार तर २-४ गाड्या चोरीतील, पण दिल्लीतील एका सराईत चोराने चोरलेल्या कारची संख्या ऐकून कुणाच्याही भुवया उंचावतील. कार चोरता चोरता तो चांगलाच श्रीमंत बनला आणि त्याने आपले कुटुंबही वाढविले

या चोराने तब्बल ५००० गाड्या चोरल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी अनिल चौहान नावाच्या एका चोराला पकडले असून या सराईत चोरांनी २७ वर्षात तब्बल ५००० गाड्या चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच अनिलने चोरी व्यतिरिक्त खून, शस्त्रास्त्र कायदा उल्लंघन आणि तस्करीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी हा सगळ्यात मोठा चार चाकी वाहन चोर असल्याचा दावा केला.

९० च्या कळात अनिल रिक्षा चालवणारा हा अनिल चौहान पुढे गाड्या चोरू लागला. केवळ दिल्लीतच नाही. तर देशाच्या विविध भागातून वाहने चोरून तो जम्मू-काश्मीर, उत्तर भारतीय राज्ये किंवा नेपाळमध्ये विकायचा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक मारुती ८०० कार चोरणाऱ्या अनिलने चोरीसाठी टॅक्सी चालकाची हत्या केल्याचेही समोर आले आहे. अनिलवर सुमारे १८० गुन्हे दाखल आहेत. त्याला पकडण्याची ही पहिलीच वेळ नाही. तुरुंगवास भोगल्यानंतर तो बाहेर आला आणि पुन्हा ‘कामाला’ लागला.

चोरीच्या माध्यमातून संपत्ती जमवल्यानंतर तो दिल्ली सोडून आसाममध्ये स्थायिक झाला. त्याने दिल्ली, मुंबई सोडून इतर राज्यात मालमत्ता खरेदी केल्याचे समजते. ईडीने सुद्धा मनी लॉन्ड्रींग प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. २०१५ मध्ये काँग्रेस आमदारासोबतही त्याला अटक करण्यात आली होती. १८० गुन्हे असलेला आरोपीला ३ पत्नी असून ७ अपत्य आहेत. आसाम मध्ये सरकारी कंत्राटदार बनला होता. पोलिसांनी त्याच्याकडून ६ पिस्तूल व ७ काडतुसे जप्त केले आहेत.

हे ही वाचा:

पाकिस्तानकडून भारतीय जवानांवर हल्ला

बेंगळुरूतील आयटी कर्मचाऱ्यांच्या कार गेल्या वाहून, ट्रॅक्टर आला धावून

ब्रिटनकडून ‘लगान’ वसूल करण्याची वेळ

‘या’ दिवशी ७५ रुपयांत बघा कुठलाही सिनेमा

आरोपी बद्दल सूत्रांनी टीप दिल्यावर सोमवारी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने देशबंधू गुप्ता रोड परिसरातून अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो उत्तर प्रदेशमधून शस्त्र आणून नागालँडमधील प्रतिबंधित संघटनांना पुरवत असे, त्यामुळे पोलीस त्याचा दहशवादाच्या दृष्टिकोनातूनही तपास करीत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,969चाहतेआवड दर्शवा
1,946अनुयायीअनुकरण करा
41,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा