26 C
Mumbai
Sunday, September 25, 2022
घरक्राईमनामापिंपरीतील छोट्या आदित्यची हत्या अपहरणातून नव्हे प्रेमप्रकरणातून

पिंपरीतील छोट्या आदित्यची हत्या अपहरणातून नव्हे प्रेमप्रकरणातून

सात वर्षांच्या आदित्यला आमिष दाखवून पळवले होते

Related

पिंपरी-चिंचवड येथे एका ७ वर्षीय बालकाची अपहरण करून हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पण यात जो अपहरणाचा अँगल होता तो नंतर बाद ठरला आणि प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली.

आदित्य ओगले असं बालकाच नाव असून बिल्डिंग खाली खेळायला गेलेला आदित्य घरी परतलाच नाही. त्या संदर्भात आई-वडिलांनी स्थानिक पोलिस स्थानकात जावून हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस तपास सुरु झाला. तपासणी मध्ये प्रेमप्रकरणातून आदित्यचा अपहरण करून, नंतर त्याची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले. मुख्य आरोपी मंथन किरण भोसले आणि सहआरोपी अनिकेत मुद्रे याना अटक करण्यात आले आहे व पोलीस पुढील तपासणी करत आहेत.

मंथन भोसले हा इंजिनियरिंगचा विद्यार्थी आहे. अपहरण कारण्यापूर्वी मंथन आणि त्याचा साथीदार आदित्य राहत असलेल्या परिसरात ३-४ दिवसांपासून रेकी करत होते. आदित्यच्या मोठ्या बहिणीच्या प्रेमाला घरात विरोध असल्याचा राग मनात ठेवून बहिणीच्या प्रियकराने मित्राच्या मदतीने ७ वर्षाच्या आदित्य ओगलेच बिल्डिंगखाली खेळत असताना खोटे आमिष दाखवून अपहरण केले. भोसरी एमआयडीसी येथील बंद पडलेल्या कारखान्याच्या टेरेसवर आदित्यची हत्या करण्यात आली. त्यापूर्वी अपहरणाचा बनाव रचण्यासाठी बांधकाम व्यावसायिक आणि आदित्यचे वडील गजानन ओगले यांच्या कडून २० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. पण खंडणी मिळण्यापूर्वीच प्रेमभंग झाल्याचा राग ठेवून आदित्यची हत्या करण्यात आली.

हे ही वाचा:

विसर्जन घाटावर जनरेटरची वायर तुटून ११ भाविक जखमी

चीनचे सैनिक या भागातून चाललेत मागे

राणी एलिझाबेथ यांच्या निधनाबद्दल एक दिवसाचा दुखवटा

याकुब मेमन कबर प्रकरणात मुख्यमंत्री काय म्हणाले?

संबंधित घटनेमध्ये आदित्यची हत्या ही खंडणीसाठी झाली नसून प्रेमभंग झाल्याच्या रागातून हत्या करण्यात आली. मंथनने हत्या केल्यानंतर काही दिवस तो पोलिसांच्या सोबत फिरायचा. परंतु हत्येची सुई आरोपी भोसलेंच्या दिशेने येऊ लागल्यानंतर पोलीस कामात अडथळा आण्याचा प्रयत्न करू लागला. पोलीस तपासात खंडणीचा संदेश आलेला मोबाईल नंबर तपासला असता, मंथन भोसलेच्या आईचं नाव उघड झाले. अथक चौकशी नंतर पोलिसी खाक्या दाखवल्यावर आरोपी मंथन भोसलेने हत्येची कबुली दिली. त्यानंतर मंथन व त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीतील साथीदार अनिकेत मुद्रे अटक करण्यात आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,967चाहतेआवड दर्शवा
1,943अनुयायीअनुकरण करा
39,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा