30 C
Mumbai
Sunday, October 13, 2024
घरक्राईमनामाप्रशिक्षणार्थी सैनिकाला बांधून मैत्रिणीवर बलात्कार?

प्रशिक्षणार्थी सैनिकाला बांधून मैत्रिणीवर बलात्कार?

१० लाखांची खंडणी, मध्य प्रदेशातील इंदूरमधील घटना

Google News Follow

Related

मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शहरापासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या जाम गेटजवळ दोन प्रशिक्षणार्थी लष्करी सैनिक आपल्या दोन महिला मैत्रिणींसह फिरायला गेले होते. जाम गेटजवळ लष्कराची जुनी फायरिंग रेंज असून, तेथे रात्री उशिरापर्यंत हे चौघे बसले होते. यावेळी अचानकपणे ७ ते ८ बदमाशांनी चौघांवर हल्ला करत दोघांना ओलीस ठेवून दोघांकडून सोडवण्यासाठी १० लाखांची खंडणी मागितली. याच काळात एका महिलेवर सामुहिक बलात्कार झाल्याचा आरोपही आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

इंदूर ग्रामीण एसपी हितिका वासल यांनी सांगितले की, लष्कराची जुनी फायरिंग रेंज असलेल्या ठिकाणी चार जण गेल्याची आम्हाला काल रात्री उशिरा माहिती मिळाली. यावेळी दोघांना बंदिस्त ठेवून मारहाण करण्यात आली आणि दोघांना १० लाखांच्या खंडणीसाठी पाठवण्यात आले. ओलीस ठेवण्यात आलेल्यांपैकी फिर्यादीने सांगितले की, सोबत असलेल्या मैत्रिणीला बदमाशांनी बाजूला नेले, त्यानंतर तिचा किंचाळण्याचा आवाज ऐकू आला, तिच्यावर अत्याचार झाल्याची शंका आहे.

हे ही वाचा : 

जम्मू- काश्मीर: कुपवाडातील जंगलामधून लष्कराला सापडला मोठा शस्त्रसाठा

चंदीगडमध्ये माजी पोलिसांच्या घरी ग्रेनेड स्फोट, १ अटक, २ संशयित फरार !

कर्नाटक: गणपती मिरवणुकीवर दगडफेक प्रकरणी ५२ जणांच्या आवळल्या मुसक्या

कर्नाटकच्या मंड्यामध्ये दर्ग्याजवळून जात असलेल्या गणपती मिरवणुकीवर दगडफेक

महिला अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाली, पोलिसांना पाहून आरोपींनी पळ काढला. प्रकरणाच्या तपासासाठी १० पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत. या प्रकरणात सहा आरोपी आहेत, सर्वांच्या नावाची माहिती मिळाली आहे, यातील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. उर्वरित चार जणांना पकडण्याचे काम सुरु आहे.

दरम्यान, फिर्यादीने मैत्रिणीवर बलात्कार झाल्याची शंका उपस्थित केली आहे. परंतु, पिडीत महिलेने यावर अजून काही भाष्य केलेले नाही, असे महिला अधिकाऱ्याने सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
182,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा