भोपाळमध्ये दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने अटक केलेला संशयित दहशतवादी अदनानने राम मंदिरासह अनेक धार्मिक स्थळांना लक्ष केले होते. अदनान आयसिसच्या कट्टरपंथी विचारसरणीने प्रभावित असल्याचे सांगितले जाते आणि तो राम मंदिरासह उत्तर प्रदेशातील अनेक प्रमुख हिंदू धार्मिक स्थळांवर हल्ल्यांची योजना आखत होता.
उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) अदनानची चौकशी करण्यासाठी दिल्लीत पोहोचले. त्याने एटीएसला सांगितले की तो राम मंदिरासह उत्तर प्रदेशातील अनेक प्रमुख हिंदू धार्मिक स्थळांवर हल्ल्यांची योजना आखत होता. दिल्लीत आलेल्या एटीएस पथकाने शनिवारी त्याची चौकशी केली.
२०२४ मध्ये वाराणसीतील ज्ञानवापी मशीद संकुलाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देणारे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांना धमकी दिल्यावर अदनानचे नाव सर्वप्रथम चर्चेत आले. अदनानने न्यायाधीशांना हत्येची धमकी दिली. या घटनेनंतर, उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) भोपाळमध्ये अदनानला तात्काळ अटक केली. चौकशीदरम्यान, त्याचा आयसिसशी संबंध असल्याचे पुरावे हाती आले आणि त्यामुळे प्रकरण आणखी चिघळले.
जवळजवळ पाच महिन्यांनंतर अदनानला जामिनावर सोडण्यात आले होते. मात्र, सुटकेनंतरही त्याच्या हालचाली संशयास्पद राहिल्या. दिल्लीत आलेल्या यूपी एटीएस पथकाने शनिवारी अदनानची पुन्हा चौकशी केली आणि त्यात अनेक धक्कादायक खुलासे उघड झाले. चौकशीदरम्यान अदनानने कबूल केले की तो अयोध्येतील राम मंदिर तसेच उत्तर प्रदेशातील इतर महत्त्वाच्या हिंदू तीर्थस्थळांवर हल्ला करण्याचा कट रचत होता.
हे ही वाचा :
नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण होण्यापूर्वी श्रीराम मंदिर होईल सुसज्ज
जुलै–सप्टेंबर तिमाहीत १.४८ अब्ज डॉलर्सच्या टेक्नॉलॉजी डील्स
बनावट मतदारांचे नावे वगळली जाणार असल्याने ममता बॅनर्जी घाबरल्या
ऑपरेशन सिंदूरमधून स्वदेशी तंत्रज्ञानाची प्रतिष्ठा वाढली
आयसिसचा प्रचार केला
एटीएसच्या म्हणण्यानुसार, अदनानने सोशल मीडियाद्वारे कट्टरपंथी सामग्री शेअर केली आणि आयसिसच्या प्रचाराला चालना दिली. मुस्लिम धार्मिक स्थळांभोवती सुरू असलेल्या सर्वेक्षणांमुळे आणि वादांमुळे तो रागावलेला होता, असे मानले जाते. अदनानने चौकशीत सांगितले की, या घटनांमुळे तो दुखावला गेला होता आणि बदला घेण्याचा त्याचा दृढनिश्चय होता.
एटीएस सध्या तपास करत आहे की अदनानने उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरांना, कधी आणि किती वेळा भेट दिली. सुरुवातीच्या तपासात असे समोर आले आहे की, तो अयोध्या, वाराणसी आणि इतर संवेदनशील भागांमध्ये अनेक वेळा गेला होता, जिथे तो स्थानिक नेटवर्क तयार करण्याचा प्रयत्न करत होता.
ISIS आतंकी अदनान का बड़ा खुलासा, निशाने पर राम मंदिर समेत कई धार्मिक स्थल #UttarPradesh #UPPolice #RamMandir | @hardikdavelive pic.twitter.com/4ich3vsnCf
— Zee News (@ZeeNews) October 27, 2025







