28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरक्राईमनामाशिवसेनेचे मंत्री अनिल परब यांची ईडीकडून ११ तास चौकशी

शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांची ईडीकडून ११ तास चौकशी

Google News Follow

Related

शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची ईडीने मंगळवारी तब्बल ११ तास चौकशी केली. मनी लॉन्डरिंग प्रकरणात परब यांना चौकशीसाठी ईडीने समन्स पाठवले होते. उद्या म्हणजे बुधवारी पुन्हा एकदा त्यांना बोलावण्यात आले आहे.

बॅलार्ड इस्टेट येथे अनिल परब हे या चौकशीच्या निमित्ताने ईडी कार्यालयात हजर झाले होते. पीएमएलए कायद्यानुसार सकाळी ११.२० वाजता ईडी कार्यालयात परब यांचा जाबजबाब नोंदविण्यात आला. १५ जूनला त्यांना समन्स पाठविण्यात आले होते त्यावेळी ते ईडी कार्यालयात हजर राहिले नाहीत.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील समुद्रकिनाऱ्यावर समुद्रकिनारा नियमावलीचा भंग करत रिसॉर्टची उभारणी केल्याचा आरोप परब यांच्यावर आहे.

या चौकशीनंतर बाहेर आल्यावर पत्रकारांशी बोलताना अनिल परब म्हणाले की, मला ईडीच्या अधिकाऱ्यांनी जे प्रश्न विचारले त्याची मी उत्तरे दिली. दापोलीचे रिसॉर्ट माझे असल्याचे म्हटले जाते पण ते माझ्या मालकीचे नाही.

हे ही वाचा:

चहा पिताना रागाने पाहिले म्हणून केली हत्या; दोघांना केली अटक

महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या अध्यक्षपदी रणजित सावरकर

“मविआ सरकार अल्पमतात; उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा”

महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन होणार!

 

गेल्या महिन्यात ईडीच्या पथकांनी परब यांच्या मालमत्तेवर छापेमारी केली होती.त्यांच्याविरोधात पीएमएलए अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. परब हे शिवसेनेचे तीनवेळा आमदार राहिले आहेत. विधान परिषदेवर ते निवडून आले आहेत.

अनिल परब हे परिवहन मंत्री असून उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा