27 C
Mumbai
Tuesday, August 9, 2022
घरराजकारणएकनाथ शिंदे आणि सोबत असलेल्या आमदारांना गुवाहाटीला हलवले

एकनाथ शिंदे आणि सोबत असलेल्या आमदारांना गुवाहाटीला हलवले

Related

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ३५ आमदारांना आता गुवाहाटी, आसाम येथे हलविण्यात येत असल्याचे वृत्त आहे. हे सगळे आमदार गुजरातच्या सूरत येथे आहेत. आता त्यांना अधिक सुरक्षित स्थळी म्हणून गुवाहाटीत नेले जाणार आहे. त्यासाठी आमदारांची बस विमानतळाकडे रवाना करण्यात आल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या आमदारांना आणण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी गुजरातला निघाले असल्याचीही बातमी आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासह या बंडखोर आमदारांनी सूरत येथे प्रयाण केले होते. ले मेरेडियन या हॉटेलमध्ये ते आहेत. शिवसेनेविरोधात या शिंदे आणि आमदारांनी बंडाचे निशाण उभारले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे.

यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. त्याआधी, शिंदे यांनी शिवसेनेपुढे काही अटी ठेवल्याचेही बोलले जात होते. शिवसेनेने भाजपासोबत सरकार स्थापन करावे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांशी काडीमोड घ्यावा अशी मागणी शिंदे आणि आमदारांची आहे, असे म्हटले जाते.

या सगळ्या घडामोडींमुळे महाराष्ट्रात राजकारण टिपेला पोहोचले आहे. शिवसेनेच्या नेत्यांच्या उद्धव ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर बैठका झाल्या. शिवाय, दादर येथील शिवसेनाभवनात शिवसैनिकांनी गोळा होऊन घोषणाबाजी केली.

हे ही वाचा:

शिवसेनेचे ‘हे’ आमदार एकनाथ शिंदेंसोबत

चहा पिताना रागाने पाहिले म्हणून केली हत्या; दोघांना केली अटक

महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या अध्यक्षपदी रणजित सावरकर

शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांची ईडीकडून ११ तास चौकशी

 

शिवसेनेचे एकूण ५५ आमदार असून त्यातील ३५ आमदार शिंदे यांच्यासोबत असल्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार असे म्हटले जात आहे. ३५ आमदार जर फुटले तर महाविकास आघाडी सरकारचा बहुमताचा आकडा खाली येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५३ तर काँग्रेसकडे ४४ आमदार आहेत.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,918चाहतेआवड दर्शवा
1,924अनुयायीअनुकरण करा
15,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा