25 C
Mumbai
Thursday, February 9, 2023
घरक्राईमनामाजंगलात जप्त केलेली हाडे श्रद्धाचीच

जंगलात जप्त केलेली हाडे श्रद्धाचीच

नमुने वडिलांच्या डिएनएशी जुळले

Google News Follow

Related

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात दिल्ली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. दिल्ली पोलिसांनी मेहरौली आणि गुरुग्रामच्या जंगलातून जप्त केलेल्या हाडांचे डीएनए  श्रद्धाचे वडील विकास वालकर यांच्या डिएनएशी जुळले आहेत. पोलिसांनी आरोपी आफताबसह मेहरौली आणि गुरुग्रामच्या जंगलात अनेक दिवस शोध मोहीम राबवली, जिथून मानवी जबड्याचे हाड, मांडीचे हाड आणि शरीराचे काही अवयव सापडले. जप्त केलेली हाडे दिल्ली पोलिसांनी तपासासाठी सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे पाठवली आहेत. यासोबतच श्रद्धाच्या वडिलांचा डीएनए नमुनाही सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे पाठवण्यात आला आहे. आरोपींना शिक्षा होण्यासाठी हा डीएनए अहवाल पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

श्रद्धाचा लिव्ह इन पार्टनर आफताब अमीन पूनावाला याने पोलिसांच्या चौकशीत त्याने १८ मे रोजी श्रद्धाची निर्घृण हत्या केल्याची कबुली दिली. त्यांनी श्रद्धाचा मृतदेह दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथील त्यांच्या भाड्याच्या निवासस्थानी ३०० लिटरच्या फ्रीजमध्ये सुमारे तीन आठवडे ठेवला आणि शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे तुकडे केले. आफताबला दक्षिण दिल्ली पोलिसांनी १२ नोव्हेंबर रोजी श्रद्धाच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केली होती. तो सध्या पोलीस कोठडीत असून तिहार तुरुंगात आहे.

हे ही वाचा:

अमित शहांचा सल्ला, ‘सीमाभागावर दावे नकोत’

धक्कादायक! दहा ते १७ वयोगटातील दीड कोटी मुले व्यसनाधीन

श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारची समिती

१ लाख बँकेतून गायब झाले आणि पोलिसांनी लगेच ते मिळविलेही!

पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी आफताबची पॉलीग्राफ आणि नार्को टेस्ट केली आहे. दोन्ही चाचण्यांमध्ये आफताबने श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे करून जंगलात फेकल्याची कबुली दिली. पॉलीग्राफ अहवालात पोलिसांना अनेक नवीन गोष्टी सापडल्या आहेत. मात्र, या चाचणीतही आफताबने पोलिसांच्या चौकशीदरम्यान जे काही बोलले होते त्याच गोष्टींची पुनरावृत्ती केली होती. मात्र हे सर्व अहवाल पुरावे म्हणून न्यायालयात सादर करण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,906चाहतेआवड दर्शवा
2,003अनुयायीअनुकरण करा
61,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा