30 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
घरक्राईमनामाचालकाच्या चलाखपणामुळे विद्यार्थी अपघातातून बचावले

चालकाच्या चलाखपणामुळे विद्यार्थी अपघातातून बचावले

नागरिकांसह पोलिसांनी केलं कौतुक

Google News Follow

Related

इगतपुरी तालुक्यात असलेल्या पूर्व भागातील नाशिक नगर या दोन जिल्ह्यांना जोडणारा म्हैसवळण घाटात शाळेच्या सहलीच्या बसचा अपघात झाला. हा अपघात ब्रेक फेल झाल्यामुळे झाला असल्याचे सांगितले जात आहे. चालकाने दाखवलेल्या चलाखपणामुळे विद्यार्थी थोडक्यात बचावले असल्याची संपुर्ण नाशिकमध्ये चर्चा सुरु आहे. बसमध्ये एकूण ४० विद्यार्थी होते. त्यापैकी चार विद्यार्थी गंभीर झाले असून दहा विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

शैक्षणिक सहलीच्या बसचा अपघात झाल्याची माहिती समजल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचबरोबर एसएमबीटी रुग्णालयातील रुग्णवाहिका बोलावून विद्यार्थ्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
इस्कॉन मंदिर संस्थेकडून चाळीस विद्यार्थी टाकेद तीर्थावर सहलीसाठी आले होते. त्यानंतर त्यांनी विश्रामगड पट्टाकिल्ला परिसराला भेट दिली. परतीच्या प्रवासात नाशिक नगर जिल्हा सरहद्दीवर वाघोबा जवळ गाडीचे ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात आले.

त्यावेळी चालकाने चलाखपणा दाखवून आणि चालकाने बस डोंगराच्या एका बाजूला घुसवली. त्यामुळे कसल्याहि प्रकारची जीवितहानी झाली नाही. पण गाडी उलटी झाली, त्यामध्ये चार विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली आहे. आणि दहा विद्यार्थी जखमी झाले आहेत.

हे ही वाचा:

पाकिस्तानचे डोळे उघडले? म्हणतात, भारताशी तीन युद्धे केल्यामुळे झालो गरीब

जोशीमठमधील हॉटेलनंतर आता घरे पाडण्याचा निर्णय

पाकिस्तानात १३ वर्षांच्या हिंदू मुलींना पळवून होत आहेत विवाह, धर्मांतरण

महाराष्ट्राला मिळाली भरभक्कम गुंतवणूक

शर्मा टूर्स अँड ट्रॅव्हलची हि बस होती. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने गाडी बाजूला करुन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. मागच्या अनेक दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सतत अपघात होत आहेत. चालकाचे नागरिकांनी, पालकांनी आणि पोलिसांनी सुध्दा कौतुक केलं आहे. या सगळ्या प्रकरणाची पोलिस कसून चौकशी करीत आहेत.सहलीच्या या गाडीचे ब्रेक फेल होऊन सुद्धा चालकाने चलाखपणा दाखवल्याने अनेक मुले सुखरूप आहेत म्हणून चालकाचे कौतुक होत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा