29.8 C
Mumbai
Friday, May 3, 2024
घरक्राईमनामाछोटा राजन कोरोनामुक्त; रुग्णालयातून बाहेर

छोटा राजन कोरोनामुक्त; रुग्णालयातून बाहेर

Google News Follow

Related

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला दिल्लीतील एम्स रुग्णालयातून मंगळवारी सोडण्यात आले. कोरोना झाल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आता कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्यावर त्याला सोडण्यात आले आहे. या रुग्णायात दाखल करण्यात आल्यानंतर छोटा राजनचा मृत्यू झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. पण नंतर रुग्णालयाकडून तो उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले. तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असताना छोटा राजनचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्याला २७ एप्रिलला उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल केले होते.

हे ही वाचा:

मराठा आरक्षण केंद्रावर ढकलण्याची प्रक्रिया सुरू

राज्यातील म्युकोरमायकॉसिसचा धोका वाढला

अनिल देशमुखांची मुलेही ईडीच्या रडारवर?

काँग्रेस पक्ष कांगावखोर, कद्रू, नकारात्मकता पसरवणारा

तब्बल २६ कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकणी गँगस्टर छोटा राजनसह तिघा जणांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने जानेवारी महिन्यात ही शिक्षा सुनावली होती.

छोटा राजन ऊर्फ नाना म्हणजेच राजन सदाशिव निकाळजे प्रारंभी अंडरवर्ल्ड डॉन आणि मुंबई बॉम्ब हल्ल्याचा आरोपी दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार होता. मात्र, कालांतराने दोघांमध्ये टोकाचं शत्रुत्व निर्माण झालं.

छोटा राजनने मुंबईतील एका चित्रपटगृहाबाहेर काळाबाजार करण्याचं काम सुरु केलं. त्यानंतर त्याची भेट राजन नायर ऊर्फ बडा राजन याच्याशी भेट झाली. बडा राजनकडे काम केल्यानंतर तो गुन्हेगारी विश्वाकडे वळला. येथूनच त्याच्या गुन्हेगारी विश्वातील कट-कारस्थानाला सुरुवात झाली. तो दारुची तस्करी करु लागला. बडा राजनच्या मृत्यूनंतर गुन्हेगारी विश्वात तो छोटा राजन म्हणून नावारूपाला आला. त्याच्यावर खंडणी, हत्या, तस्करीचे अनेक आरोप आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा