20 C
Mumbai
Monday, January 24, 2022
घरक्राईमनामानिकिता दत्ता मोबाईल चोरी प्रकरणात दोघे अटकेत

निकिता दत्ता मोबाईल चोरी प्रकरणात दोघे अटकेत

Related

गेल्या महिन्यात वांद्रे येथे अभिनेत्री निकिता दत्ताचा आयफोन चोरी करणाऱ्या दोघांना रविवारी अटक करण्यात आली. आरोपींकडून फोन विकत घेणाऱ्या आणखी एका व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी फोन जप्त केला असून गुन्ह्यात वापरलेली चोरीची केटीएम दुचाकी जप्त केली आहे.

ही घटना २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सव्वा सात वाजता वांद्रे पश्चिमेतील १४ व्या रोडवरील गुरुनानक नर्सिंग होमजवळ घडली. दुचाकीस्वारांपैकी एकाने दत्ताच्या डोक्यावर टॅप करून तिचे लक्ष विचलित केले होते, तर दुचाकीस्वाराने तिचा फोन हिसकावला आणि दोघे घटनास्थळावरून पळून. आरोपींनी त्याच दिवशी आणखी चोऱ्या केल्या होत्या अशी माहिती  पोलिसांनी दिली आहे.

हे ही वाचा:

ओमिक्रॉनचा पहिला बळी; ब्रिटनमध्ये झाली नोंद

‘हा विजय म्हणजे महाविकास आघाडीला चपराक’

अकोल्यात शिवसेनेला धक्का; वसंत खंडेलवाल विजयी

नागपूरच्या जागेवर चंद्रशेखर बावनकुळे यांची बाजी

आरोपी मुजीब मिठाईवाला (२१) हा मोटारसायकल चालवत होता  तर सैफ अब्दुल अन्सारी (२६) हा मागे बसला होता त्यानेच निकिता दत्ता यांचा फोन हिसकावून  घेतला.  या दोघांकडून आयफोन खरेदी करणाऱ्या ३२ वर्षीय रेहबर खानलाही अटक करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,588अनुयायीअनुकरण करा
5,780सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा