33 C
Mumbai
Saturday, November 27, 2021
घरक्राईमनामामुंबई विमानतळावर जप्त केले २० कोटींचे ड्रग्ज

मुंबई विमानतळावर जप्त केले २० कोटींचे ड्रग्ज

Related

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज विरोधी कारवायांना जोर आला असून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने तब्बल चार किलो ड्रग्ज जप्त केले आहेत. या ड्रग्जची किंमत तब्बल २० कोटी इतकी आहे. या प्रकरणी दोन परदेशी महिलांना अटक करण्यात आली आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने केलेल्या कारवाईत चार किलो हेरॉईन जप्त करण्यात आले असून याची किंमत २० कोटी इतकी आहे. कारवाई दरम्यान दोन परदेशी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्या महिलांकडे युगांडाचा पासपोर्ट आढळून आला आहे.

हे ही वाचा:

एमआयएमने पुन्हा दिली मुस्लिम आरक्षणाची बांग! ११ डिसेंबरला मोर्चा!

‘पाकिस्तानवर कारवाई न करणे ही मनमोहन सिंग सरकारची कमजोरी’

उत्तर प्रदेशात उभी राहणार १० हजार कोटींची चित्रसृष्टी

जेव्हा शरद पवारांच्या सरकारने केलेला गोवारी समाजावर लाठीचार्ज!

अटक केलेल्या महिलांची नावे मान्सिम्बे जयानाह आणि क्यांगेरा फातुमा अशी आहेत. त्यांनी जुबा (सूडान) ते दुबई आणि दुबई वरुन मुंबई असा प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. कस्टम विभागाने मुंबई विमानतळावर या महिलांना अटक केल्यांनतर न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने या आरोपी महिलांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

तीन दिवसांपूर्वीच मुंबईतील शिवडी येथून पाच कोटींचे ड्रग्ज मुंबई गुन्हे शाखेकडून जप्त करण्यात आले होते. त्यापूर्वीही मुंबई एनसीबीच्या पथकाने जळगावमध्ये धडक कारवाई करत तब्बल १५०० किलो गांजा जप्त केला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,506अनुयायीअनुकरण करा
4,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा