29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरराजकारणअरविंद केजरीवाल म्हणतात, महिलांनो, 'आप'ले सरकार आणा, हजार रु. कमवा!

अरविंद केजरीवाल म्हणतात, महिलांनो, ‘आप’ले सरकार आणा, हजार रु. कमवा!

Google News Follow

Related

आगामी विधनसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नामी शक्कल शोधून काढली आहे. यापूर्वी प्रत्येक महिना ३०० युनिट्स ची मोफत वीज आणि मोफत आरोग्य सेवा देण्याचे वचन त्यांनी दिले होते. पण आता केजरीवाल यांनी एक नवा फंडा आणला आहे. पंजाबच्या जनतेला खुश करण्यासाठी ते म्हणतात की, जर २०२२ च्या विधानसभेत आम आदमी पक्षाचे सरकार आले तर अठरा वर्षांवरील प्रत्येक महिलेला महिना एक हजार रूपये आम्ही देऊ.

केजरीवाल यांनी त्यावेळी हे सुद्धा नमूद केले, जर कोणत्या महिलेला निवृत्तीवेतन मिळत असेल तर, त्या महिलेला देखील अतिरिक्त एक हजार रक्कम मिळेल. केजरीवालांची ही योजना जर अमलात आली तर जगातील महिलांसाठीची सर्वात मोठी योजना असेल. मोगा येथील एका रिसॉर्टमध्ये महिलांना संबोधीत करताना केजरीवाल यांनी या घोषणा केल्या. त्यांनी महिलांना आवाहन केले की, ‘आप’ला संधी द्या आणि फक्त घरात स्वतःचे स्थान बळकट करा. पुरुषांपेक्षा महिला प्रबळ आहेत हे दाखवून द्या.

केजरीवाल म्हणतात, आता माझे विरोधक विचारतील ” मी पैसे कुठून आणणार ?” याचे उत्तर सुद्धा आहे माझ्याकडे.  मी वाहतूक क्षेत्रातील आणि वाळू माफिया पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांच्यासोबत बसलेले पाहिले आहेत. आम्हाला त्या माफियांना संपवायचे आहे आणि त्यासाठी कोणतीही कमतरता पडणार नाही.

दिल्लीत महिलांसाठी मोफत प्रवास योजना राबवून आम्ही ती यशस्वी करून दाखविली आहे. त्यासाठी आमच्या सरकारला वर्षाला फक्त १५० कोटी रुपये खर्च करावे लागले. याची तुलना करायची झाली तर गुजरात सरकारने १९० कोटीचे खासगी जेट खरेदी केले आहे.

 

हे ही वाचा:

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात अंतरिम वाढ करता येईल का, असा शासनाचा प्रस्ताव

ती मैदानात आली आणि बसली विराटच्या मांडीवर! अनुष्का म्हणाली…

परमबीर यांच्या घरावर चिकटविली ही नोटीस

… त्याने शिवसेना आमदारालाच सेक्स्टॉर्शनच्या जाळ्यात अडकविण्याचा केला प्रयत्न

 

त्यावेळी ते असेही म्हणाले की, त्यांच्या पक्षाच्या सदस्यांना कोणत्याही भ्रष्ट मार्गाने पैसा कमवायचा नाही. त्यामुळे कारभारात पैशाची अडचण येणार नाही. ज्या महिलांनी शेतकरी आंदोलनात भाग घेतला त्याचे कौतुक केले. पंजाबचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ‘आप’ला संधी देऊन निर्णायक भूमिका बजावण्यास त्यांनी महिलांना सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा