25 C
Mumbai
Thursday, March 30, 2023
घरक्राईमनामागुगल कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवणारा सापडला

गुगल कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवणारा सापडला

खोडसाळपणा करण्याचा प्रयत्न

Google News Follow

Related

बीकेसी येथील गुगल इंडियाच्या कार्यालायत रविवारी हैद्राबादमधील एका व्यक्तीने दूरध्वनी करून गुगलच्या पुण्यातील कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली. प्राथमिक तपासात तो खोडसाळपणा असल्याचे निष्पन्न झाले असून याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी हैद्राबाद येथील पणयम बाबू शिवानंद नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बाबू शिवानंद याला याप्रकरणात अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

लोकसभा सचिवालयाची राहुल गांधी यांना हक्कभंगाची नोटीस

सरकार पडण्याची कसलीही भीती वाटत नाही

पत्रकार वारिसेंच्या कुटुंबाला २५ लाखांची मदत

राज्यातील सरकार गद्दारांचे नसून खुद्दारांचे

बीकेसी येथील गुगल इंडियाच्या दूरध्वनीवर रविवारी दूरध्वनी आला होता. त्या शिवानंदने केलेल्या या दूरध्वनीत त्याने पुणे गुगलच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली. याबाबत पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी तात्काळ पुणे पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तेथे तपासणी केली असता कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.

अखेर त्याबाबत मुंबई पोलिसांना कळवण्यात आले. त्यानंतर गुगलच्या वतीने दिलीप तांबे यांनी बीकेसी पोलीस ठाण्यात धमकीची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी शिवानंदविरोधात ५०५(१)(ब) व ५०६(२) अंतर्गत धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास केला असता दूरध्वनी हैद्राबाद येथून आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार बीकेसी पोलिसांचे एक पथक हैद्राबादला रवाना झाले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,877चाहतेआवड दर्शवा
2,034अनुयायीअनुकरण करा
65,700सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा