25 C
Mumbai
Monday, January 17, 2022
घरक्राईमनामा५० रुपये चोरले म्हणून वडिलांनी केली मुलाची हत्या

५० रुपये चोरले म्हणून वडिलांनी केली मुलाची हत्या

Related

वडिलांनी केलेल्या मारहाणीत एका मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दहा वर्षाच्या मुलाने घरातून ५० रुपये चोरले या कारणावरून वडिलांनी केलेल्या बेदम मारहाणीत मुलाचा मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना ठाण्यातील कळवा येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी कळवा पोलिसांनी वडिलांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. संदीप उर्फ बबलू प्रजापती (४१) असे अटक करण्यात आलेल्या पित्याचे नाव आहे.

कळवा पूर्वेतील वाघेबा नगर या ठिकाणी संदीप हा आपल्या दहा वर्षाचा मुलगा मनीष याच्यासोबत राहायला होता. संदीप हा मजुरी करत असून त्याचा मुलगा मनीष हा शाळा शिकत होता. बुधवारी संध्याकाळी संदीप हा घरी आला त्यावेळी त्याने मुलाला खिशातले ५० रुपये चोरले का असा प्रश्न विचारात त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत संदीपने मनीषच्या डोक्यात जड वस्तूने मारल्यामुळे त्याला डोक्याला इजा झाली आणि तो जागीच बेशुद्ध झाला.

हे ही वाचा:

समीर वानखेडे यांचा एनसीबी कार्यकाळ संपला; कशी होती त्यांची कारकीर्द?

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भाजपचे वर्चस्व

श्रीनगरमधील चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी ठार

खणखणीत नाणे, नारायण राणे

त्यानंतरही वडिलांनी त्याच्याकडे लक्ष न दिल्यामुळे मनीष हा रात्रभर तसाच पडून होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मनीष झोपेतून उठत नाही म्हणून त्याला हलवले असता त्याचे शरीर थंडगार पडले होते. त्यानंतर शेजाऱ्यांनीच मनीष याला उपचारासाठी कळवा रुग्णालयात आणले. तेव्हा डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच कळवा पोलिसांनी रुग्णालयात जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला. तेव्हा मनीषच्या डोक्याला आतून कवटीला मार लागून मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी कळवा पोलिसांनी संदीप याला अटक केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,582अनुयायीअनुकरण करा
5,710सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा