28 C
Mumbai
Monday, September 14, 2026
घरक्राईमनामाभारत-बांगलादेश सीमेवरून २५ कोटींचे सोनं जप्त; महिला ताब्यात

भारत-बांगलादेश सीमेवरून २५ कोटींचे सोनं जप्त; महिला ताब्यात

बीएसएफची मोठी कारवाई

Google News Follow

Related

पश्चिम बंगालमधील भारत-बांगलादेश सीमेवर सीमा सुरक्षा दलाने (BSF) सोन्याच्या तस्करीचा मोठा प्रयत्न हाणून पाडला आहे. नदिया जिल्ह्यातील बनपूर सीमा भागातून तब्बल १५ किलो ६०७ ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलं असून, त्याची किंमत सुमारे २४ कोटी ९५ लाख ५६ हजार रुपये आहे. या प्रकरणी एका महिलेला ताब्यात घेण्यात आलं आहे.

बीएसएफच्या ३२व्या बटालियनला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर बनपूर परिसरातील फुलबारी भागात विशेष कारवाई करण्यात आली. जवानांनी बराच वेळ परिसरावर नजर ठेवली होती. यावेळी एका महिलेच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानंतर तिला ताब्यात घेऊन झडती घेण्यात आली. त्यावेळी तिच्याकडून मोठ्या प्रमाणात सोनं जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या सोन्याचं वजन १५,६०७.०१० ग्रॅम असून, त्याची बाजारातील अंदाजे किंमत २४ कोटी ९५ लाख ५६ हजार ९० रुपये असल्याचं बीएसएफने सांगितलं आहे. या कारवाईमुळे भारत-बांगलादेश सीमेवर सुरू असलेल्या सोन्याच्या तस्करीविरोधातील कारवाईला मोठं यश मिळालं आहे.

ताब्यात घेतलेल्या महिलेची बीएसएफच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. हे सोनं सीमेपर्यंत कसं पोहोचलं, ते कोणाला देण्यात येणार होतं आणि या तस्करीच्या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास केला जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं जप्त झाल्याने हा केवळ एकटा तस्करीचा प्रयत्न नसून, त्यामागे मोठं नेटवर्क असण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा:

दुर्घटनेनंतर चीन – नेपाळ यांच्यात ‘तू तू मैं मैं’

जॉर्डनमधील दोन अमेरिकी तळांवर इराणकडून क्षेपणास्त्र हल्ले

नेपाळमधील मृतांचा आकडा ८०० पार; ४ हजारांहून अधिक बेपत्ता

३१ बांगलादेशी नागरिकांवर कारवाई; हद्दपारीसाठी मालदाला रवाना

बीएसएफकडून प्राथमिक चौकशी पूर्ण केल्यानंतर संबंधित महिलेला कृष्णगंज पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्यानंतर पोलिसांकडून तिच्याविरोधात पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तस्करीच्या या नेटवर्कचा स्रोत आणि या सोन्याची अंतिम डिलिव्हरी कुठे होणार होती, याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
333,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा