38 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
घरक्राईमनामाअयोध्येच्या निर्मली कुंड चौक परिसरात आढळले हातबॉम्ब

अयोध्येच्या निर्मली कुंड चौक परिसरात आढळले हातबॉम्ब

Google News Follow

Related

उत्तरप्रदेशमधील प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत रविवार, २६ जून रोजी हातबॉम्ब (हॅण्डग्रेनेड) आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. या पवित्र भूमीतील वर्दळीच्या निर्मली कुंड चौक परिसरात डझनभर हातबॉम्ब आढळून आले. यामुळे स्थानिक पोलिसांसह सर्वच सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत.

अयोध्या हे देशातील संवेदनशील शहरांपैकी एक असून प्रभू रामचंद्रांचे भव्य मंदिर येथे उभारले जात आहे. याचदरम्यान या शहरात डझनभर हॅण्डग्रेनेड सापडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. कँट भागातील लष्कराच्या प्रशिक्षण केंद्रापासून तीन किलोमीटर अंतरावर झुडपात हे हॅण्डग्रेनेड सापडल्याची माहिती समोर आली आहे. सापडलेले हॅण्डग्रेनेड नष्ट करण्यात आले असून उत्तर प्रदेश पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दहशतवादीविरोधी पथकही अधिक सतर्क झाले असून परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.

हे ही वाचा:

“आदित्य ठाकरे राऊतांसारखं बोलायला लागले तर भविष्य वाईट”

“शिवसेना पक्ष प्रमुखांना राऊतांसारखा प्रवक्ता चालतो का?”

बंडखोर आमदारांवरील कारवाईची वकिलांनी सांगितली कायदेशीर बाजू

उदय सामंत नॉट रिचेबल; गुवाहाटीला रवाना?

अयोध्या कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष मिलन निषाद यांनी सांगितले की, “निर्मली कुंडमध्ये राहणाऱ्या एका स्थानिक तरुणाने हे हँडग्रेनेड पहिले. हातबॉम्ब हे निर्मली कुंड चौकाजवळील नाल्याजवळ सापडले. जिथे एका बाजूला लष्कराची कुंपण आहे. तिथेच झुडुपांमध्ये हे हातबॉम्ब आढळले. लष्करी शूटिंग रेंज जवळ असली तरी ग्रेनेड सराव तिथे केला जात नाही. शिवाय लष्करी प्रशिक्षण केंद्रातून हाताने ग्रेनेड फेकल्यास इतके दूर जाणार नाहीत त्यामुळे सखोल तपास आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा