कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांना हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी नेहा पवार नावाच्या महिलेविरुद्ध ठाण्यातील चितळसर पोलीस ठाण्यात खंडणी व माहिती तंत्रज्ञान अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आमदार पाटील हे ठाण्यातील हिरानंदानी परिसरात वास्तव्यास आहेत. निवडणुकीपूर्वी त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सअॅप कॉल आला. सुरुवातीला त्यांनी तो कॉल उचलला नाही, मात्र वारंवार कॉल आल्याने त्यांनी तो स्वीकारला. कॉलच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या महिलेने स्वतःचे नाव नेहा पवार असे सांगत, “मी तुम्हाला ओळखते, तुमच्याशी मैत्री करायची आहे, मी सुंदर आहे, तुम्हाला हवे ते देईन,” असे बोलत अश्लील संभाषण सुरू केले.
पाटील यांनी कॉल कट करून त्या क्रमांकाला ब्लॉक केले. परंतु त्यानंतरही दुसऱ्या क्रमांकावरून ती महिला वारंवार कॉल, मेसेज व अश्लील फोटो पाठवू लागली. पाटील यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले असता, तीने उलट त्यांना पोलीस तक्रारीची धमकी देत दबाव आणण्याचा प्रयत्न केला.
यानंतर १९ सप्टेंबर २०२५ रोजी ती महिलेने पुन्हा संपर्क साधत १० लाख रुपयांची मागणी केली. इतकेच नव्हे तर, एका व्यक्तीचे बँक खाते क्रमांक व आधारकार्ड पाठवत, “वडील आजारी आहेत, पैशांची खूप गरज आहे,” असे सांगून पैशांची मागणी केली.
हे ही वाचा :
दक्षिण मुंबई हादरली ! २० वर्षीय मनोरुग्ण तरुणीवर १७ नराधमांचा लैंगिक अत्याचार; दोघांना अटक!
बरेलीत जुम्मा नमाजसाठी कडेकोट बंदोबस्त; ४५०० हून अधिक पोलीस तैनात, २० महिला पथकं सज्ज!
फिलीपिन्समध्ये ७.६ तीव्रतेचा भूकंप!
आयपीएस वाय पूरन कुमार आत्महत्या प्रकरणी हरियाणाच्या दोन वरिष्ठ पोलिसांविरुद्ध गुन्हा
संपूर्ण प्रकार लक्षात येताच, आमदार पाटील यांनी चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर नेहा पवार हिच्याविरुद्ध खंडणी आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमाखाली गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.







