31 C
Mumbai
Saturday, November 15, 2025
घरराजकारणअहिंसेचा पुरस्कार करणाऱ्या काँग्रेसचे माजी मंत्री सुबोध सावजी म्हणतात, त्याला गोळ्या घालू

अहिंसेचा पुरस्कार करणाऱ्या काँग्रेसचे माजी मंत्री सुबोध सावजी म्हणतात, त्याला गोळ्या घालू

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्याविरोधात वादग्रस्त विधान

Google News Follow

Related

अहिंसेचा सातत्याने नामजप करणारे, गांधीजींचा वारसा चालविण्याचा दावा करणारे काँग्रेसचे माजी मंत्री सुबोध सावजी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूटफेक करणाऱ्या वकिलाला आपण गोळ्या घालण्यास तयार असल्याचे विधान सुबोध सावजी यांनी केले आहे.

सरन्यायाधीश भूषण गवई  यांच्यावर सुनावणीदरम्यान बूट भिरकवण्याचा प्रयत्न वकील राकेश तिवारी यांनी केला. या घटनेचे पडसाद देशभरात उमटले. पंतप्रधानांपासून अनेक नेत्यांनी या गोष्टीचा निषेध केला. या माथेफिरू वकिलास गोळी मारण्यात तयार असल्याचे वक्तव्य करून सावजी यांनी वाद ओढावून घेतला आहे.

सावजी हे याआधीही अशाच वक्तव्यांमुळे वादात सापडलेले आहेत. मागे भाजपाचे आमदार राम कदम यांची जीभ छाटण्याचे आवाहन त्यांनी केले होते त्यासाठी ५ लाख देण्याची तयारी त्यांनी दाखवली होती. तसेच ईव्हीएम घोटाळा झाला तर निवडणूक आयुक्तांचा खून करण्याचा इशारा याच सावजी यांनी दिला होता. त्यामुळे सातत्याने कुणाला तरी यमसदनी धाडण्याची इच्छा सावजी व्यक्त करत असतात.

हे ही वाचा:

बरेलीत जुम्मा नमाजसाठी कडेकोट बंदोबस्त; ४५०० हून अधिक पोलीस तैनात, २० महिला पथकं सज्ज!

नवी मुंबईत एनएसई मल्टीस्पेशालिटी कॅन्सर हॉस्पिटलचे भूमिपूजन

कॉम्प्लेक्स खतांच्या वापरात होणार वाढ

हवेत प्रदूषणामुळे वाढला हा धोका

बुलढाण्यातील माजी मंत्री सावजी म्हणाले की, देशाच्या इतिहासात इतकी गंभीर घटना घडूनही देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री बघ्याची भूमिका घेत असतील आणि त्याला कुठलीही शिक्षा होत नसेल तर मलाही वाटतं, हातात पिस्तूल घ्यावं आणि या वकिलावर गोळ्या झाडाव्या. त्याशिवाय, सावजी यांनी अशीही मागणी केली की, वकिलावर गोळ्या झाडल्यावर माझ्यावर कोणतीही कारवाई करू नये, मला कुठलीही शिक्षा करण्यात येऊ नये.

वकील राकेश तिवारी यांनी सरन्यायाधीश बी.आर.गवई यांच्यावर बूट भिरकवण्याचा प्रयत्न केला. त्यांना या कृतीचा कुठलाही पश्चाताप नसल्याचे समोर आले आहे. एका दैवी शक्तीने आपल्याकडून हे कृत्य करवून घेतल्याची प्रतिक्रिया तिवारी यांनी केला. मध्य प्रदेशातील खजुराहो येथील जावरी मंदिरातील भगवान विष्णूंच्या मूर्तीच्या जिर्णोद्धार करण्याच्या मागणीच्या याचिकेदरम्यान सरन्यायाधीश गवई यांनी टिप्पणी केली होती. त्यामुळे आपल्या धार्मिक भावना दुखावल्याचा दावा रमेश किशोर तिवारी यांनी केला. त्यातून आपण हे कृत्य केल्याचा त्यांचा दावा आहे.

मध्य प्रदेशातील खजुराहो हे मंदिर युनोस्कोच्या यादीतील जागतिक वारसा स्थळ आहे. या परिसरातील जवारी मंदिरात भगवान विष्णूची सात फूट उंच मूर्ती आहे. ही मूर्ती भग्न अवस्थेत आहेत. या शीर तुटलेल्या मूर्तीची पुननिर्माण करण्याची विनंती राकेश दलाल यांनी याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टाकडे केली होती. ही भंग झालेली मूर्ती बदलून तिची प्राण प्रतिष्ठा करण्याची परवानगी द्यावी अशी त्यांनी विनंती केली होती.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
281,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा