माजी आमदार झिशान सिद्दीकींना धमकी दिल्याप्रकरणी अटकेत असलेल्या मोहम्मद दिलसाद नौशादच्या चौकशीत गुन्हे शाखेने मोठा खुलासा केला आहे. तपासादरम्यान उघड झाले की, दिलसादने भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंगलाही ईमेलद्वारे ५ कोटी रुपयांची खंडणी मागून धमकी दिली होती.
गुन्हे शाखेने किल्ला न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, आरोपीने स्वतःला डी-कंपनीचा सदस्य असल्याचे भासवून धमकी पाठवली होती. रिंकू सिंगच्या इव्हेंट मॅनेजरला पाठवलेल्या ईमेलमध्ये “पैसे न दिल्यास जीवे मारू” अशी स्पष्ट धमकी होती.
तपासानुसार, दिलसादने प्रथम रिंकू सिंगला ५ फेब्रुवारी २०२५ रोजी शुभेच्छा आणि आर्थिक मदतीची विनंती करणारा ईमेल पाठवला. प्रतिसाद न मिळाल्याने, ९ एप्रिलला त्याने थेट ५ कोटी रुपयांची मागणी केली आणि २० एप्रिलला तिसरा धमकीचा मेल पाठवला.
रिंकू सिंगने लगेच पोलिसांकडे तक्रार दिली. त्याच सुमारास, आरोपीने झिशान सिद्दीकींनाही ईमेलद्वारे १० कोटी रुपयांची मागणी केली. तपासात या धमक्या वेस्ट इंडिजमधील त्रिनिदाद आणि टोबॅगो येथून पाठवल्या गेल्याचे निष्पन्न झाले. इंटरपोलच्या मदतीने दिलसादला भारतात प्रत्यार्पित करून १ ऑगस्टला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली.
हे ही वाचा :
हनीट्रॅपचा सापळा! कोल्हापूरचे अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांना अडकविण्याचा प्रयत्न!
दक्षिण मुंबई हादरली ! २० वर्षीय मनोरुग्ण तरुणीवर १७ नराधमांचा लैंगिक अत्याचार; दोघांना अटक!
बरेलीत जुम्मा नमाजसाठी कडेकोट बंदोबस्त; ४५०० हून अधिक पोलीस तैनात, २० महिला पथकं सज्ज!
फिलीपिन्समध्ये ७.६ तीव्रतेचा भूकंप!
गुन्हे शाखेचा प्राथमिक निष्कर्ष असा आहे की दिलसादचा डी-कंपनीशी प्रत्यक्ष संबंध नसून, तो सायबर पद्धतीने खंडणी उकळण्याचा प्रयत्न करत होता. पोलिस आता या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय टोळीचे जाळे आहे का, याचा तपास करत आहेत.







