33 C
Mumbai
Saturday, November 27, 2021
घरक्राईमनामामी बॉस नंबर १ आहे का हे माहीत नाही! परमबीर यांनी चौकशीत...

मी बॉस नंबर १ आहे का हे माहीत नाही! परमबीर यांनी चौकशीत केले स्पष्ट

Related

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची काल चौकशी करण्यात आली. मात्र एका दिवसाच्या झालेल्या चौकशीने गुन्हे शाखा समाधानी नसल्यामुळे लवकरच परमबीर यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाणार आहे. सचिन वाझे यांच्या स्टेटमेंटनुसार गुन्हे शाखेच्या तपासात बॉस नंबर १ म्हणजे परमबीर आहे, असे समोर आले होते. या आरोपांबाबत परमबीर यांना विचारले असता, मला कोण कोणत्या नावाने हाक मारतात याबद्दल मला काहीही कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले.

परमबीर सिंग हे आज चांदीवाल आयोगासमोर हजर राहण्याची शक्यता आहे. गोरेगावच्या ज्या गुन्ह्यात परमबीर चौकशीला हजर झाले त्याच गुन्ह्यात किला कोर्टाने त्यांना फरार घोषित करण्याची नोटीस काढली होती. ती नोटीस रद्द व्हावी म्हणून परमबीर यांच्याकडून किला कोर्टात अर्ज करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

‘२६/११ चा हल्ला हा मानवतेवर आणि सार्वभौमत्वावर झालेला हल्ला होता’

भूकंपाच्या झटक्यांनी पूर्व, ईशान्य भारत हादरला

छत्रपतींच्या रायगडावर येणार राष्ट्रपती

I am श्रेयस अय्यर, हाफ सेंचुरीवाला

परमबीर सिंग हे तब्बल २३१ दिवसानंतर गुरुवारी मुंबईत दाखल झाले होते. मुंबईत दाखल होताच सिंग हे मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ११च्या कांदिवली येथील कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. त्यानंतर त्यांची तब्बल साडेसहा तास चौकशी करण्यात आली. गोरेगाव येथील खंडणीप्रकरणी मुंबई गुन्हे शाखा कक्ष ११ कडून त्यांचा जबाब नोंदवला गेला आहे. परमबीर सिंग आज न्या. चांदीवाल आयोगाच्या चौकशीला सामोरे जाण्याची शक्यता आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,506अनुयायीअनुकरण करा
4,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा