30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरक्राईमनामाआता खैर नाही! नरसंहाराच्या काश्मिरी फाइल्स पुन्हा उघडणार

आता खैर नाही! नरसंहाराच्या काश्मिरी फाइल्स पुन्हा उघडणार

Google News Follow

Related

९० च्या दशकात जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंची अमानुष हत्या झाली होती. तत्कालीन सरकारने आणि स्थानिक प्रशासनाने त्या काळात हिंदूंना आलेल्या समस्यांचा आणि त्यांना त्यांचे राज्य सोडावे लागले या दु:खाचा कधीच अधिकृतपणे स्वीकार केला नाही. जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचे प्रमुख फारुख अहमद दार उर्फ ​​बिट्टा कराटे यांनी ज्या व्यक्तीची हत्या केली होती त्या पीडीताचे कुटुंब श्रीनगर सत्र न्यायालयात पोहोचले आहे.

‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काश्मिरी हिंदूंच्या भावना पुन्हा भडकल्या असून, ३१ वर्षांपासून दुःख लपवून ठेवलेल्या सतीश टिक्कूच्या कुटुंबीयांनी आता सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ज्यामध्ये सतीश टिक्कू यांच्या हत्येचा पुन्हा तपास करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

फारुख अहमद दार उर्फ ​​बिट्टा कराटे हा जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख होता. तो दहशतवादी कारवायांमध्ये सामील होत. त्याने त्याचा जवळचा मित्र सतीश टिक्कूची हत्या केल्यानंतर त्याची जिहादी मानसिकता जानेवारी १९९० मध्ये समोर आली. हिंदू हत्याकांडातील दहशतवादी बिट्टा कराटेची ही पहिलीच हत्या होती. बिट्टाने व्हिडिओमध्ये या हत्येची कबुली दिली आहे. बिट्टाने व्हिडिओमध्ये एकूण ४० काश्मिरी हिंदूंची हत्या केल्याची कबुली दिली होती.

जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी २२ मार्च २०२२ रोजी विधान केले की, आवश्यक असल्यास हिंदूंच्या नरसंहाराच्या फायली पुन्हा तपासासाठी उघडल्या जाऊ शकतात. ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटानंतर बिट्टा याच्या इस्लामिक दहशतवादाने पीडित टिक्कू यांचे पहिले कुटुंब न्यायालयात पोहोचले आहे.

हे ही वाचा:

महाविकास आघाडीचे आणखीन २ नेते तुरुंगात जाणार?

कोकण रेल्वेची धमाकेदार कामगिरी! पंतप्रधान मोदींनीही केले कौतुक

आदित्य ठाकरे यांच्या सूचनेला बारसू ग्रामस्थांचा विरोध

मोहित कंबोज यांची मागणी; मशिदींवर बेकायदेशीर भोंगे हटवा!

सतीश टिक्कूच्या कुटुंबीयांच्या वतीने श्रीनगर सत्र न्यायालयात उपस्थित असलेले वकील उत्सव बैंस यांनी दहशतवादी बिट्टा कराटे यांच्यावर दाखल असलेल्या सर्व खटल्यांच्या सद्यस्थितीची माहिती मागितली आहे. याशिवाय यासिन मलिक, जावेद नाल्का यांच्यासह अनेक दहशतवाद्यांवर फौजदारी खटल्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा