मध्य प्रदेशातील रतलाम येथे शिवलिंगावर पाय ठेवून रील बनवण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. हिंदूंच्या संतापानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपी इम्रान उर्फ सुक्खाच्या मुसक्या आवळ्या आहेत. त्याच्याविरुद्ध धार्मिक भावना भडकवण्यासह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी इम्रान हा सराईत गुन्हेगार आहे. रतलामच्या स्टेशन रोड पोलिस ठाण्यातील मानक चौकात त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वीच तो तुरुंगातून सुटून बाहेर आला होता. आरोपी इम्रानने सोशल मीडिया साइट इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड केला होता.
हे ही वाचा :
सैफ हल्ला प्रकरणात अटकेतील आरोपी आणि सीसीटीव्हीमधील व्यक्ती एकचं!
१६ हजार संघस्वयंसेवक उतरले महाकुंभच्या मैदानात, वाढत्या गर्दीला आवरणार!
यंदाचा अर्थसंकल्प नवा आत्मविश्वास, ऊर्जा देईल!
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात; १६ विधेयके सूचीबद्ध!
या व्हिडिओमध्ये तो शिवलिंगावर पाय ठेवताना दिसत होता. बुधवारी (२९ जानेवारी) जेव्हा लोकांनी हा व्हिडिओ पाहिला तेव्हा संतापाची लाट पसरली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी शोध सुरु केला. पोलिसांनी सायबर टीमच्या मदतीने व्हिडिओची तपासणी केली आणि अखेर गुरुवारी (३० जानेवारी) आरोपी इम्रानला अटक केली. या प्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत.