प्रयागराज महाकुंभ मेळ्यातील भाविकांची प्रचंड गर्दी पाहता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १६ हजार स्वयंसेवकांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत चालवण्याचे काम हाती घेतले आहे. हे स्वयंसेवक कुंभमेळा परिसरातील विविध चौकाचौकात आणि रस्त्यांवर तैनात राहणार आहेत. कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांना मार्गदर्शन करत वाहतूक नियंत्रणात ते पोलिसांना मदत करणार आहेत.
कुंभमेळा परिसरात सेवेत गुंतलेल्या एका आरएसएस स्वयंसेवकांने सांगितले की, संघाचे स्वयंसेवक गेल्या अनेक दिवसांपासून महाकुंभाच्या तयारीत व्यस्त आहेत. कुंभमेळा परिसरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी स्वयंसेवकांना विशेष प्रशिक्षणही देण्यात आले आहे. हे स्वयंसेवक पोलिसांसोबत एकत्रितपणे काम करतील आणि भाविकांना सर्वतोपरी मदत करतील.
हे ही वाचा :
यंदाचा अर्थसंकल्प विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी नवा आत्मविश्वास, ऊर्जा देईल
हमासकडून सहा महिन्यांनंतर लष्करी नेता मोहम्मद डिफच्या मृत्यूची पुष्टी
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात; १६ विधेयके सूचीबद्ध!
मुंबईच्या चेंबूर भागात मेट्रोचे बांधकाम कोसळले; जीवितहानी नाही
महाकुंभासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता वाहतूक व्यवस्थेचे मोठे आव्हान असल्याचे संघ स्वयंसेवकाने सांगितले. अशा परिस्थितीत संघ कार्यकर्त्यांची ही भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. या स्वयंसेवकांच्या उपस्थितीने भाविकांना वाहतुकीची सोय होणार असून वाहतूकही सुरळीत चालणार असल्याचे स्वयंसेवकाने सांगितले.
याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक कुंभमेळा परिसरात स्वच्छता, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या सेवांमध्ये योगदान देत आहेत. महाकुंभ हा राष्ट्रीय कार्यक्रम असून प्रत्येकाने त्यात योगदान दिले पाहिजे, असे संघाचे मत आहे.