28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरक्राईमनामाकिडनीच्या बहाण्याने गायिकेने घातला साडेआठ लाखांचा गंडा

किडनीच्या बहाण्याने गायिकेने घातला साडेआठ लाखांचा गंडा

Google News Follow

Related

एका नेपाळी गायिकेने नेपाळी वॉचमनच्या बायकोला किडनी विकण्याचे आमिष दाखवत तब्बल साडेआठ लाखांचा गंडा घातल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. महिलेच्या परिस्थितीचा फायदा या गायिकेने घेतला असून याप्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ऑगस्ट महिन्यात गुन्हा दाखल होऊनही अद्याप पोलिसांनी या प्रकरणातल्या आरोपींना अटक केलेली नाही.

कल्पना मगर या मूळच्या नेपाळ येथील असून अंबरनाथला त्या त्यांचे पती आणि मुलांसह राहतात. त्यांचे पती एका बांधकाम साईटवर वॉचमन म्हणून काम करतात. तर कल्पना या धुणीभांडी करतात. २०१९ मध्ये कल्पना या नेपाळमध्ये असताना त्या नेपाळी गायिका रुबिना बादी यांच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. त्यानंतर भारतात आल्यावर त्यांनी फेसबुकवर रुबिना बादी यांना शोधून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर बोलताना त्यांनी रुबिना बादी हिला आपली आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचे सांगितले.

रुबिनाने कल्पना यांना आपण आपली किडनी विकल्याने आपल्याला ४ कोटी रुपये मिळाल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी कल्पना हिलाही किडनी विकण्याचे सुचवले. किडनी विकायची असल्यास १० लाख रुपये डिपॉझिट म्हणून द्यावे लागतील, त्यानंतर परदेशात नेऊन किडनी काढली जाईल, अशी बतावणी रुबिना हिने केली.

त्यानंतर कल्पना यांनी रुबिनाचा पती अरविंद कुमार याच्या खात्यात मे २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत साडेआठ लाख रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर आपली किडनी कधी विकली जाईल? अशी विचारणा कल्पना यांनी केली असता रुबिना आणि तिच्या पतीने टाळाटाळ सुरू केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कल्पना यांनी सामाजिक कार्यकर्ते भारत सोनार यांच्या मदतीने दिल्लीमधून अरविंद याचे बँक डिटेल्स मिळवले आणि दिल्ली पोलिसांकडे धाव घेतली. दिल्ली पोलिसांनी अरविंद कुमार आणि रुबिना बादी या दोघांनाही पोलीस ठाण्यात आणल्यानंतर या दोघांनी १५ दिवसात सगळे पैसे परत करण्याचे आश्वासन दिले.

हे ही वाचा:

इंडिया गेटवर नेताजींचा भव्य पुतळा….पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा

पणजीतून शिवसेनेने उमेदवार दिला पण उत्पल पर्रीकर लढत असतील तर…

अमोल कोल्हेंबाबत शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात मतभेद

स्वतःच्या सुनेला अधिकार न देणारे तौकीर महिलांना काय न्याय देणार?

मात्र, पुन्हा टाळाटाळ सुरू केल्याने कल्पना मगर यांनी ऑगस्ट २०२१ मध्ये अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी नेपाळी गायिका रुबिना बादी आणि अरविंद कुमार या दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. मात्र, यानंतर पोलिसांनी काहीच कारवाई केली नसल्याचा आरोप पीडित महिला कल्पना मगर यांनी केला आहे.

बँक अकाउंटचे दिल्लीत जाऊन डिटेल्स काढले असता त्यात तब्बल साडेसहा कोटी रुपये जमा असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे या दोघांनी अशाचप्रकारे देशभरात अनेकांना गंडा घातल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिसांना बरेच पुरावे देऊनही पोलीस काहीही कारवाई करत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते भारत सोनार यांनी केल्याचे वृत्त ‘टीव्ही ९’ने दिले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा