नाशिकमधील कॉर्पोरेट जिहादचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कर्मचारी निदा खान हिचा या प्रकरणी पोलिसांकडून शोध सुरू होता. अखेर छत्रपती संभाजीनगर येथून निदा खान हिला अटक करण्यात आली आहे. कंपनीत लैंगिक छळ आणि कॉर्पोरेट जिहाद अर्थात धर्मांतर प्रकरणांतील ती मुख्य आरोपींपैकी एक आहे, तिला जवळपास २५ दिवस पोलिसांपासून लपून राहिल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे अटक करण्यात आली.
निदा खान पोलिसांना गुंगारा देत छत्रपती संभाजीनगर येथील नारेगाव परिसरात लपून बसली होती. तिला गुरूवारी रात्री अटक करण्यात आली. त्यानंतर तिला शुक्रवार, ८ मे रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी तिला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तसेच, निदा खान हिला लपण्यासाठी मदत करत असल्याच्या आरोपाखाली छ. संभाजीनगरचे AIMIM पक्षाचे नगरसेवक मतिन पटेल यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहितीनुसार, निदा खान गेल्या काही दिवसांपासून कॅसर कॉलनीतील एका फ्लॅटमध्ये राहत होती. विशेष म्हणजे तिच्यासोबत तिचे चार नातेवाईकही फ्लॅटमध्ये सोबत राहायचे. पोलिसांना तिच्या लोकेशन बदलाची माहिती वेळोवेळी मिळायची परंतु प्रत्येक वेळी तपास यंत्रणेच्या तावडीतून वाचण्यात तिला यश येत होते. अखेर नाशिक क्राइम ब्रांच आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत तिला ताब्यात घेण्यात आले. रात्री ११.३० वाजता पोलिसांच्या पथकाने तिला अटक केली. या अटकेनंतर सर्वात आधी तिची मेडिकल चाचणी करण्यात आली. त्यानंतर ट्रांजिट वॉरंट प्रक्रियेत तिला छ. संभाजीनगर न्यायालयासमोर हजर केले.
हे ही वाचा:
जायंट किलर सुवेंदू आता पश्चिम बंगालचे ‘अधिकारी’
“सोमनाथ मंदिर म्हणजे आपल्या संस्कृतीच्या अढळ निश्चयाचे प्रतीक”
थलपती विजयशी ‘मैत्री’ काँग्रेसला पडली महागात
क्रिकेटनंतर ‘टॅक्स पिच’वरही महेंद्रसिंह धोनी अव्वल
नाशिकमधील TCS प्रकरण समोर आल्यापासून पोलीस निदा खानच्या शोधात होती. २५ मार्चपासून ती फरार होती. पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकाने तिचा शोध सुरू ठेवला होता. आरोपी निदा खान वारंवार तिचे लोकेशन बदलत होती. जवळच्या नातेवाईकांनी तिला लपवण्यात मदत केली होती. त्यातच अंतरिम जामिनासाठी तिने प्रयत्न सुरू केला होता. परंतु न्यायालयाने तिला दिलासा दिला नाही.







