29.6 C
Mumbai
Saturday, June 27, 2026
घरक्राईमनामाधक्का लागून मोबाईल खाली पडला म्हणून एकाला भोसकले

धक्का लागून मोबाईल खाली पडला म्हणून एकाला भोसकले

आरोपीचा शोध सुरू

Google News Follow

Related

रस्त्याने चालतांना चुकून धक्का लागला आणि हातातील मोबाईल फोन पडल्यामुळे संतापलेल्या एकाने ३५ वर्षीय ऑफिस बॉयला चाकूने भोसकल्याची घटना गुरुवारी रात्री माहीम रेल्वे स्थानकाजवळ घडली.

या हल्ल्यात ऑफिस बॉय गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर रुगणालयात उपचार सुरू आहे.माहीम पोलिसांनी या घटनेनंतर पळून गेलेल्या अनोळखी आरोपीविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस आरोपीच्या मागावर असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली.

हे ही वाचा:

रिकाम्या पोटी लीची खाणे ठरू शकते धोकादायक? कारण घ्या जाणून

वरळी सी-लिंकवरून व्यापाऱ्याची आत्महत्या

राबडी देवी लवकरच खाली करणार १०, सर्क्युलर रोड येथील सरकारी बंगला

भारत-जपान संबंधांना गती; ताकाइची भारत दौऱ्यावर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माहीम परिसरात राहणारा नवीन प्रसन्ना (३५) हा लोअरपरळ येथे एका खाजगी कार्यालयात ऑफिस बॉयचे काम करतो. गुरुवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास नवीन प्रसन्ना हा कार्यालयातुन घरी येण्यासाठी लोअर परळ येथून ट्रेनने माहीम रेल्वे स्थानकावर उतरला होता.

सेनापती बापट मार्ग येथून पायी जात असताना समोरून येणाऱ्या आरोपीला नवीन प्रसन्ना याचा चुकून धक्का लागला आणि आरोपीच्या हातातून मोबाईल निसटुन जमिनीवर पडला. नुकताच रिपेअर करून आणलेला मोबाईल पडल्यामुळे आरोपीने नवीन प्रसन्नाला शिवीगाळ करून खिशात असलेला चाकूने नवीन याच्यावर हल्ला केला.

दरम्यान नवीनच्या बचावासाठी आलेल्या इतर पादचारी आणि स्थानिकांना आरोपीने चाकूचा धाक दाखवून कोणी मध्ये आले तर त्यालाही सोडणार नाही असे धमकी देत तेथून पळ काढला.
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नवीनला नागरिकांनी तातडीने नजीकच्या रुगणालयात दाखल करून माहीम पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली.

माहीम पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेऊन जखमी नवीन याचा जबाब नोंदवला. अनोळखी आरोपी विरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहीम पोलिसाकडून सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेज वरून आरोपीचा माग काढण्यात येत असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
318,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा