29.2 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरक्राईमनामाकर्फ्यूदरम्यान 'मुजरा' करणाऱ्यांना पोलिसांनी नाचवले

कर्फ्यूदरम्यान ‘मुजरा’ करणाऱ्यांना पोलिसांनी नाचवले

Google News Follow

Related

नोएडा शहरातील दोन हॉटेल्समध्ये बुधवारी रात्री कर्फ्यूच्या वेळी ‘ मुजरा ‘ पार्टी आयोजित केल्याबद्दल पाच महिलांसह ३६ जणांना अटक करण्यात आली. नोएडामध्ये बुधवारी पाचशे पेक्षा जास्त कोविड रुग्णांची नोंद झाली. जी आतापर्यंत नोंद झालेल्या साथीच्या वाढीच्या काळातील सर्वाधिक नोंद होती.

ग्रेटर नोएडाच्या बीटा-२ पोलीस स्टेशनला बुधवारी सेक्टर सिग्मा-१ येथील हॉटेलमध्ये रात्री कर्फ्यू दरम्यान पार्टी आयोजित करण्यात येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. बुधवारी रात्री अकराच्या वाजण्याच्या सुमारास पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. आणि त्यांनी हॉटेल मालक व दोन महिलांसह पाच जणांना अटक केली. अटक केलेल्या दोन महिलांनी दुसऱ्या अजून एका हॉटेल मध्ये मुजरा पार्टी चालू असल्याचे सांगितले.

त्यानंतर पोलीस पथकाने दुसऱ्या हॉटेलवर छापा टाकला आणि तळमजल्यावर पार्टी चालू असल्याचे आढळून आले. तेथून आणखी तीन महिला आणि २८ पुरुषांना अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन छाप्यांमधून एक लाख ३० हजार रोख रक्कम आणि आठ कार जप्त केल्या आहेत.

अटक करण्यात आलेले काही लोक वेश्याव्यवसायाच्या रॅकेटचा भाग असल्याचा पोलिसांना संशय असून त्यांच्यावर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका रंग उत्पादक कंपनीच्या दोन मालकांनी ही पार्टी आयोजित केली होती. अटक करण्यात आलेल्या ३६ जणांमध्ये त्याचे व्यवस्थापक विपुल सेठी यांचा समावेश आहे.

हे ही वाचा:

महिलेच्या केसात थुंकणाऱ्या जावेद हबीबचा माफीनामा

अभिमानास्पद!! वर्षभराच्या आत १५० कोटी लसीकरण

मिनी लॉकडाऊनचा निर्णय लवकरच

मुंबई पालिकेकडून गृह विलगीकरणासाठी नवी नियमावली जाहीर… वाचा सविस्तर

 

आरोपींवर भारतीय दंड संहिता २६९ (बेकायदेशीरपणे किंवा निष्काळजीपणे जीवाला धोकादायक रोगाचा संसर्ग पसरवणे), आणि कलम २७० (जीवासाठी धोकादायक रोगाचा संसर्ग पसरण्याची शक्यता घातक कृत्य) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासाच्या आधारे त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा