मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन व्यक्तींना बनावट पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट (PCC) तयार करून शासकीय कंत्राटी नोकऱ्या मिळवण्यासाठी त्याचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे देबज्योती बासू आणि अनूप वर्म अशी आहेत.
गुन्हे शाखेने आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना ८ जुलै २०२५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
गुन्ह्याचा तपशील असा आहे की, जानेवारी २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत आरोपींनी बनावट पोलिस क्लिअरन्स प्रमाणपत्रे तयार केली होती. ही सर्टिफिकेट्स मुंबई पोलिसांच्या स्पेशल ब्रँचची असल्याचे भासवून त्यावर बनावट शिक्के आणि सही लावण्यात आल्या होत्या. या बनावट प्रमाणपत्रांचा वापर करून कोलाबा येथील नौदल कार्यालयात कंत्राटी पद्धतीने नोकरी मिळवण्यासाठी अर्ज करण्यात आला होता.
या प्रकरणात गुन्हे शाखेचे अधिकारी अविनाश तात्या राम गवडे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांनी आरोप केला की, ही बनावट कागदपत्रे नरीमन पॉईंट येथील “आकाश इन्फ्राटेक” या कार्यालयात तयार करण्यात आली होती.
हे ही वाचा:
‘शिवाजी महाराजांची स्वराज्याची लढाई पेशव्यांनी १०० वर्षे चालवली!’
मराठी माणसाला लक्षात आले असेल ठाकरेंचा दुटप्पीपणा!
टॉयलेटमध्ये फ्लश झाला दिल्लीत २६/११ घडवण्याचा कट ?
भारताचे ऑपरेशन ‘सिंधू’, पाकिस्तानच्या घशाला कोरड!
या प्रकरणाचा तपास करत असताना संबंधित पोलिस प्रमाणपत्रांची शहानिशा करण्यात आली असता ती बनावट असल्याचे उघड झाले. यानंतर कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आणि तपासाची जबाबदारी गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आली.
सध्या या प्रकरणात आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये कलम ३१८(१), ३३५, ३३६(२), ३३७, ३३९ आणि ३४०(२) यांचा समावेश आहे.
