बीडचे गोरक्षक आणि समस्त हिंदू आघाडीचे आधारस्तंभ संग्राम ढोले पाटील यांनी नुकतीच शेवगाव तालुक्यामध्ये बोधेगाव या ठिकाणी पोलिसांच्या मदतीने कसायांच्या कारवायांचा पर्दाफाश केला. त्यांच्याकडे बोधेगावच्या स्थानिक नागरिकांच्या तक्रारी होत्या.
या ठिकाणी गो मातेची कत्तल केली जाते संग्राम ढोले पाटील यांनी रात्री अकरा वाजता दारुड्याचा वेष धारण करून हातात दारूची बाटली घेऊन त्या कत्तलखान्याची व्याख्या केली आणि पहाटे साडेतीन वाजता पोलिसांच्या मदतीने कत्तल खान्यावर छापा टाकला त्यावेळी त्यांनी दोन गोवंश वाचवले. त्या कत्तलखान्यात गाय कापण्याची धारदार शस्त्र, गाईची हाडं १०००+ गाईची मुंडकी इत्यादी गोष्टी जप्त केल्या गाईच्या हाडांचा साठा मोठ्या प्रमाणात होता.
कसायांची मोठी संख्या पोलीस चौकीवर जमली होती परंतु त्या बेकायदा जमावावर पोलिसांनी कारवाई केली नाही. या कामांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी बहुमोल मार्गदर्शन केले.
हे ही वाचा:
मराठी माणसाला लक्षात आले असेल ठाकरेंचा दुटप्पीपणा!
मणिपूर: २१ इन्सास रायफल, २६ एसएलआरसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त!
राज्यात अमली पदार्थांविरोधात आक्रमक लढा!
दिल्ली सरकारचा जुन्या गाड्यांवर बंदी घालण्याचा निर्णय अखेर मागे!
पोलिसांनी सुद्धा मनापासून काम करून कामगिरी फत्ते करून दाखवली. संग्राम ढोले पाटील यांनी प्रसंगावधान राखून घेतलेल्या कष्टांमुळे बोधेगावचा कत्तलखाना बंद झाला. परंतु तो कायमस्वरूपी उद्ध्वस्त झाला पाहिजे ही त्यांनी पोलिसांकडे मागणी केली आहे.
स्थानिक सरपंचांनी याबद्दल त्यांना आश्वासन दिले आहे. गोतस्करांनी गावोगावी कत्तलखाने चालवले आहेत आणि गोमातेची मोठ्या प्रमाणात कत्तल चालू आहे ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे.
महाराष्ट्र राज्याने गोमातेला राज्य मातेचा दर्जा दिल्यानंतर सुद्धा अशा प्रकारे गो हत्या होत असेल तर ती गोष्ट संतापजनक आहे सरकारने याबाबतीत ठोस कामगिरी केली पाहिजे अशी जनतेच्या अपेक्षा आहेत.
संग्राम ढोले पाटील यांनी एक वर्षांपूर्वी पुण्याच्या सारसबागेत होणारे नमाज पठण बंद पाडले होते. त्यावेळी त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता, परंतु पोलिसांच्या कारवाईला न जुमानता त्यांनी सारसबागेत श्री शिववंदना सुरू केली होती. त्यांनी राक्षस भुवन येथे मागील वर्षी रणशार्दुल माधवराव पेशवे यांच्या पराक्रमाची आठवण म्हणून हिंदू साम्राज्य विजय दिन साजरा केला. बोधेगावमध्ये पोलीस चौकीपासून ५० मीटर अंतरावर कत्तलखाना चालू होता. हा कत्तलखाना आजच्या आज भुईसपाट पाहिजे, अशी मागणी संग्राम ढोलेपाटील यांनी गावच्या सरपंचाकडे केली आहे. त्यांच्या मागणीची पूर्तता लवकरात लवकर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
