28 C
Mumbai
Tuesday, September 27, 2022
घरक्राईमनामायूपी, दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये शंभरहून अधिक ठिकाणी छापेमारी

यूपी, दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये शंभरहून अधिक ठिकाणी छापेमारी

Related

देशातील अनेक राज्यांमध्ये शंभरहून अधिक ठिकाणी आयकर विभागाकडून छापे टाकले जात आहेत. या कारवाईत निमलष्करी दलाचीही मदत घेण्यात येत आहे. छापे टाकण्यासाठी आयकर अधिकारी सकाळी वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचले होते. राजकीय पक्षाच्या नावाने देणगी गोळा केल्याप्रकरणी हा छापा टाकण्यात आला आहे. ही फसवणूक करणाऱ्यांवर आयकर विभाग कारवाई करत आहे. विभागाने उत्तर प्रदेशातील सुमारे २४ ठिकाणी छापे टाकले आहेत.

करचुकवेगिरीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. आयकर विभाग ज्या राज्यांवर कारवाई करत आहे त्यात प्रामुख्याने उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा आणि गुजरातचा समावेश आहे. आयकर विभागाची ही कारवाई निवडणूक आयोगाच्या अहवालावर आधारित आहे.
नोंदणीकृत बिगर राजकीय पक्षांच्या करचुकवेगिरीशी संबंधित प्रकरणासंदर्भात ही कारवाई करण्यात आली आहे.

छत्तीसगडमध्ये दारू व्यावसायिक अमलोक भाटियासह अनेकांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. आयकर विभागाने राजस्थानमध्ये ५३ ठिकाणी छापे टाकले आहेत. येथील मिड-डे मील व्यापाऱ्यांवरही आयकर विभागाने छापे टाकले आहेत. त्याचवेळी दिल्ली आणि दिल्लीबाहेर कारवाईसाठी निमलष्करी दलाचा वापर केला जात आहे.

हे ही वाचा:

लव्ह जिहाद प्रकरणावरून नवनीत राणा पोलिसांना नडल्या

‘कर्तव्यपथ’वर झाले शिक्कामोर्तब

Asia Cup 2022: श्रीलंकेकडून पराभव आता भारतासाठी ‘आशा’ कप

वर्षा उसगावकर असे काय बोलल्या की त्यांना मागावी लागली माफी

काही छोट्या राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात येत आहेत. या छोट्या राजकीय पक्षांमागे कुठल्या मोठ्या राजकीय पक्षाचा पैसा किंवा काही व्यवहार आहे का, याचा तपास आयटी टीम करत आहे. यासोबतच या छोट्या पक्षांना देणग्या कुठून आणि किती येतात, त्याचाही तपास सुरू आहे. राजस्थानमधील कोतपुतली येथील मंत्री राजेंद्र यादव यांच्या नातेवाईकांच्या कारखान्यांवर आणि घरांवर छापे टाकण्यात येत आहेत. तसेच कोतपुतळीमध्येच एकूण ३७ ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,965चाहतेआवड दर्शवा
1,942अनुयायीअनुकरण करा
40,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा