28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरक्राईमनामा...म्हणून तो 'सिल्वर ओक' वर कॉल करून धमकावत होता

…म्हणून तो ‘सिल्वर ओक’ वर कॉल करून धमकावत होता

शरद पवारांना धमकी देणाऱ्याला पोलिसांनी केली अटक

Google News Follow

Related

पत्नी एका पक्षाच्या कार्यकर्त्यासोबत पळून गेली याकारणावरून तो ‘सिल्वर ओक’ बंगल्यावर कॉल करून धमकी देत होता अशी धक्कादायक माहिती बिहार येथून अटक करून मुंबईत आणण्यात आलेल्या आरोपीच्या चौकशीतून समोर आली आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना या व्यक्तीने फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली होती पण त्याला आता अटक करण्यात आली आहे.

नारायण सोनी (४६) हा मूळचा बिहार राज्यातील पण औरंगाबाद येथे राहणारा आहे. काही वर्षांपूर्वी तो पुण्यातील एका बँकेत नोकरी होता, पत्नीसोबत तो पुण्यात राहण्यास असताना त्यांच्या पत्नीला एक इसम फूस लावून पळवून घेऊन गेला होता.त्यानंतर त्याने पत्नीला परत आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले, जेव्हा त्याला कळाले की, पत्नीला पळविणारा इसम एका पक्षाचा कार्यकर्ता आहे. म्हणून त्याने या पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, त्याने शरद पवार यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला परंतु भेट होऊ न शकल्यामुळे त्याने अखेर पुणे सोडले आणि गावी बिहार येथे निघून गेला.

काही वर्षांनी पत्नी परत आली परंतु दोघे एकत्र न राहता विभक्त राहू लागले. या सर्व प्रकारातून त्याची मानसिक स्थिती बिघडली होती, रागाच्या भरात तो नेत्यांना फोन करून धमकी देऊ लागला,अशी माहिती अटक करण्यात आलेल्या आरोपी याने चौकशीत दिली असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

गीतकार जावेद अख्तर यांना याबद्दल बजावले मुंबई न्यायालयाने समन्स

दादरमध्ये काळ्यापिवळ्या टॅक्सीमुळे बस ‘लालेलाल’ झाली

मद्यधुंध चालकामुळे विद्यार्थी सापडले होते संकटात

श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारची समिती

एवढ्यावर न थांबता त्याने चक्क सिल्वर ओक बंगल्यावरील दिवाळीच्या काळात दूरध्वनीवर एक नव्हे तर चक्क शंभर वेळा फोन करून शिवीगाळ करून धमकी दिली होती. पोलिसांनी यापूर्वी त्याला बिहार पोलिसांच्या मदतीने शोधून त्याला समज देऊन सोडून दिले होते. मात्र डिसेंबर महिन्यात त्याने कहरच केला, २ ते १२ डिसेंबर दरम्यान त्याने अनेक वेळा सिल्वर ओक वर कॉल करून अश्लील भाषेत शिवीगाळ करून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.

गावदेवी पोलिसांनी हे प्रकरण गंभीरपणे घेऊन त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला व नारायण सोनी याचा शोध घेऊन बिहार राज्यातील पटणा येथून त्याला अटक करण्यात आली आहे. बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला १६ डिसेंबर पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा