बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. राजकीय वर्तुळातही हे प्रकरण गाजले होते. राज्य सरकारने या हत्या प्रकरणाची दखल घेत तपासासाठी सीआयडी आणि एसआयटीची स्थापना केली होती. आता सीआयडीने १८०० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या खंडणीसाठी करण्यात आली आणि या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचे सीआयडीने न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी सीआयडी नेमून एसआयटीची स्थापना करण्यात आली केली होती. सीआयडीने या प्रकरणी १८०० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. त्यानुसार वाल्मिक कराड हा देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाइंड असल्याच आरोपपत्रात म्हटलं आहे. खंडणी उकळण्यामध्ये संतोष देशमुख अडथळा ठरत होते. म्हणून त्यांची हत्या करण्यात आली असं सीआयडीने आरोपपत्रात म्हटलं आहे.
यासोबतच सीआयडीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रामध्ये म्हटले आहे की, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी आरोपी वाल्मिक कराड याने या घटनेतील आरोपी सुदर्शन घुलेला फोन केला होता. या प्रकरणात आठ जणांवर मकोका कायद्यातंर्गत कारवाई करण्यात आली आहे. वाल्मिक कराडसह इतर आरोपींचा या गुन्ह्यामध्ये जो सहभाग आहे, तो सुद्धा मांडण्यात आला आहे. सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे या तिघांमध्ये हत्येच्या दिवशी आणि त्याआधी जे संभाषण झालं, नेमकं काय बोलणं झालं, संतोश देशमुख यांची हत्या कशी झाली? त्याची माहिती सीआयडीच्या आरोपपत्रातून देण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे खंडणी खून आणि अॅट्रॉसिटी हे तिन्ही प्रकरण एकच असून याचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचा आरोप दोषारोप पत्रात केला आहे.
हे ही वाचा :
त्रिपुरा येथून तीन भारतीय दलालांसह १३ घुसखोर बांगलादेशींना अटक
संजय राऊत यांनी पुन्हा दाखवले स्वबळ; मविआला डच्चू
प्रयागराजमध्ये हिंदू व्यावसायिकाच्या घराबाहेर आढळले गायीचे शिर
उत्तराखंडमध्ये बर्फाखाली अडकलेल्या ४७ कामगारांची सुटका; ८ कामगारांचा शोध सुरू
संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग पुरावे म्हणून सीआयडीने आरोपपत्रात जोडले आहेत. वाल्मिक कराडला अवादा कंपनीकडून दोन कोटी रुपये खंडणी घ्यायची होती. पण त्यामध्ये संतोष देशमुख अडथळा ठरत होते. म्हणून वाल्मिक कराडने हत्येच कारस्थान रचलं. हत्येमागच हेच कारण असल्याच सीआयडीच्या आरोपपत्रात म्हटलं आहे. . आता या सर्व प्रकरणाची पुढील सुनावणी केज येथील विशेष मकोका न्यायालयासमोर होणार आहे.