26 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरक्राईमनामाश्रद्धाचे कापलेले डोके दिल्ली महापालिकेच्या या तलावात आहे का?

श्रद्धाचे कापलेले डोके दिल्ली महापालिकेच्या या तलावात आहे का?

हत्याकांडाचे सर्वात मोठे रहस्य उलगडणार

Google News Follow

Related

श्रद्धा वालकर खूनप्रकरणी पोलिसांचा तपास खोलात जाताना दिसत आहे. या हत्याकांडाचे सर्वात मोठे रहस्य अजूनही उलगडलेले नाही. कारण ज्याला हे रहस्य माहितीय आहे, तोच याचा मुख्य सूत्रधार आहे आणि गुन्हेगारही. क्रूरकर्मा आफताबच्या गुन्ह्याचे पोल खोलण्यासाठी पोलिसांचे पथके सातत्याने तपासात गुंतलेली आहेत. रविवारी दिल्ली पोलिस महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह एक तलाव रिकामे करण्यात गुंतले आहेत. छत्तरपूर एन्क्लेव्हमध्ये असलेल्या या तलावात आफताबने श्रद्धाचे डोके फेकल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

आफताबने पोलिसांसमोर कबूल केले आहे की, त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. हे तुकडे फ्लॅटमधील फ्रीजमध्ये अनेक दिवस ठेवले आणि त्या तुकड्यांची विल्हेवाट लावली. परंतु अजूनही पोलिस या खुनाच्या धागेदोऱ्यापर्यंत पोहोचलेली नाही. त्यांना अनेक प्रश्नांची उत्तरे सापडलेली नाहीत. श्रद्धाचा खून करून आफताबने श्रद्धाच्या शरीराचे तुकड्यांची कुठे विल्हेवाट लावली. श्रद्धाचे डोके कुठे फेकले. हत्येसाठी वापरलेले हत्यार कुठे फेकले, ज्या हत्यारानी क्रुरपणे श्रद्धाला मारले गेले. हे पुरावे शोधण्यासाठी दिल्ली पोलीस अनेक राज्यांमध्ये गुंतले आहेत.

दिल्ली पोलिसांना जंगलातून वेगवेगळ्या प्रकारच्या हाडांचे १७ तुकडे मिळाले आहेत. ज्यांना चौकशीसाठी पाठवण्यात आले आहे. फॉरेन्सिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, त्यांना पाहून ते माणसांचेच असल्याचे सहज ओळखता येते. मात्र, ही हाडे श्रद्धाचीच आहेत हे सिद्ध करणे आजही मोठे आव्हान असणार आहे. त्यासाठी डीएनए चाचणी केली जात आहे. फॉरेन्सिक टीमच्या म्हणण्यानुसार, यापैकी एक हाड फेमर बोन आहे, म्हणजेच मांडीचे हाड आहे. तसेच पोलिसांना मनगट आणि कोपर यांच्यातील हाड सापडले आहे. विशेष म्हणजे या हाडांवर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणाही आढळून आल्या आहेत.

पोलिस करताहेत पाच राज्यात तपास

श्रद्धा खून प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती ५ राज्यांपर्यंत पोहोचली आहे. दिल्लीत श्रद्धाची हत्या झाली होती. मुंबईत दोघांची मैत्री झाली होती. या प्रकरणाचा तपास दिल्लीपासून महाराष्ट्रात सुरू आहे. आता हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि हरियाणामध्येही पुराव्यांचा शोध सुरू आहे. मात्र आजतागायत कोणताही ठोस सुगावा लागलेला नाही. श्रद्धा खून प्रकरणाचा हिमाचलशी मोठा संबंध आहे. त्यामुळे पोलिसांनी आफताबला तेथे नेऊन तपास करण्याची तयारी केली आहे. मे महिन्यात श्रद्धाची हत्या झाली होती आणि आफताब ६ एप्रिलला कुलूमध्ये श्रद्धासोबत गेला होता. तेथे दोघेही मणिकरणच्या तोश गावात राहिले होते. त्याचवेळी हिमाचलच्या दौऱ्यावर आफताब बद्री नावाच्या व्यक्तीला भेटला, ज्याने त्याला दिल्लीतील मेहरौली येथे राहण्यास मदत केली. त्यामुळे आफताब बद्रीही पोलिसांच्या रडारवर आहे.

हेही वाचा :

रविवारी सूर्या चमकला, कीवींचा पराभव झाला

तुरुंगाची किल्ली आली हातात, ९ कैद्यांचे पलायन

वाँटेड दहशतवादी हरविंदर सिंग रिंदाचा पाकिस्तानात मृत्यू

ऋषिकेशमध्येही महत्त्वाचे पुरावे

आफताब आणि श्रद्धा उत्तराखंडमधील ऋषिकेशलाही गेल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. श्रद्धाने स्वतःचा रीलही तेथे बनवला होता. जो इन्स्टाग्रामवर अपलोडही केला होता. पोलिस तपासात असे समजते की, याआधी आफताबला श्रद्धाला ऋषिकेशमध्येच मारायचे होते. पण पकडले जाण्याची भीती होती. त्यामुळे तो घाबरला आणि त्याने दिल्लीत खून केला. ऋषिकेशमध्येही महत्त्वाचे पुरावे मिळण्याची शक्यता दिल्ली पोलिसांना आहे.

हरियाणात पुरावे शोधा

श्रद्धा हत्याकांडाचा तपास हरियाणापर्यंत पोहोचला आहे. श्रद्धाच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या करवतीचा पोलिसांनी गुरुग्रामपर्यंत शोध घेतला आहे.आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी ज्या करवतीचा उपयोग केला, ती त्याने गुरुग्राम येथील आपल्या कार्यालयाचे झुडुपात फेकली होती. त्याचाच शोध घेण्यासाठी पोलिसांनी मेटल डिटेक्टरचा वापर करून शोधमोहीम राबवली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
112,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा