26 C
Mumbai
Monday, December 11, 2023
घरक्राईमनामाहाजीअली दर्गा बॉम्बने उडवण्याची धमकी

हाजीअली दर्गा बॉम्बने उडवण्याची धमकी

Google News Follow

Related

मुंबईमधील वरळी येथील समुद्रकिनाऱ्यावरील लहानश्या बेटावर हाजीअली दर्गा आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला हाजीअली दर्ग्यावर दहशतवादी हल्ला करणार अशा धमकीचा फोन करण्यात आला आहे. या फोननंतर ताडदेव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. कुठलाही घातपात घडू नये यासाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याआधीही अनेकदा बॉम्बस्फोटाच्या धमक्या देण्यात आल्या आहेत.

परिसरातील एल अँड टीच्या साइडची तपासणी करण्यात आली. मात्र, पोलिसांच्या हाती काहीही लागलेले नाही. पोलिसांनी फोन करणाऱ्याला पुन्हा फोन केला असता त्याचा फोन बंद होता. फोन करणारे कोण होते आणि कॉल करण्यामागे काय कारण होते, याचीही तपासणी सुरू आहे. फोन करणारा हा उल्हासनगरचा असून तो मानसिक आजारी असल्याचे आतापर्यंत निष्पन्न झाले आहे. त्याच्यावर उपचारही सुरू आहेत. हा फोन ३ नोव्हेंबरला करण्यात आला होता.

यापूर्वी २० ऑगस्टला मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली होती. मुंबईचे सीपी विवेक फणसाळकर यांनी सांगितले, रात्री उशिरा मुंबईतील वाहतूक पोलिस नियंत्रणाला काही संदेश आले, ज्यामध्ये दहशत पसरवण्याबाबत धमक्या दिल्या जात होत्या.

सप्टेंबर महिन्यात मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट नाइनने रणजित कुमार साहनीला भारतात बॉम्बस्फोटाची धमकी दिल्याप्रकरणी अटक केली होती. मूळचे बिहारचे असलेले साहनी असदुद्दीन ओवेसी यांचे चाहते आहेत. त्याने दारूच्या नशेत असलेल्या सांताक्रूझ येथील एका व्यावसायिकाला व्हिडिओ कॉल करून भारतात स्फोट घडवणार असल्याचे सांगितले होते.

हे ही वाचा:

ठाकरेंना सोडवेना अनैसर्गिक नात्याचा मोह…

वेंगसरकर अकादमीची पकड; हर्ष आघावचा बळींचा षटकार, रोहन नाबाद ८३

मालवणीतल्या बांगलादेशी व रोहिंग्यांवर लक्ष ठेवा!

चोरांनी साजरा केला शाहरुख खानचा वाढदिवस

क्राइम ब्रँचने दिलेल्या माहितीनुसार, बिहारचा रहिवासी असलेल्या साहनी याला असदुद्दीन ओवेसी यांना भेटायचे होते. सांताक्रूझमधील ओवेसीशी संबंधित व्यावसायिकाचा नंबर त्याला मिळाला. साहनी यांनी सांताक्रूझच्या एका व्यावसायिकाला मेसेज केला. त्याने डझनभर संदेश पाठवले आणि नंतर त्याने कॉल केला. साहनी ओवेसींना भेटण्यासाठी हैदराबादमधील चारमिनार येथे गेले होते, मात्र त्यांना भेटता आले नाही. ओवेसींना भेटण्याची संधी न मिळाल्याने ते हतबल झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो कोणत्याही दहशतवादी कारवायांमध्ये सामील नाही आणि अंडरवर्ल्ड किंवा कोणत्याही दहशतवादी गटाशी संबंधित नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
113,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा