26 C
Mumbai
Wednesday, November 30, 2022
घरविशेषमालवणीतल्या बांगलादेशी व रोहिंग्यांवर लक्ष ठेवा!

मालवणीतल्या बांगलादेशी व रोहिंग्यांवर लक्ष ठेवा!

पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले निर्देश

Google News Follow

Related

मालाड – मालवणी परिसरात अवैधरीत्या राहणाऱ्या बांगलादेशी व रोहिंग्यांची माहिती मिळवण्यासाठी १९ ऑक्टोबर २०२२ रोजी समिती स्थापन करण्यात आली होती. त्यासमितीची आढावा बैठक घेताना बांगलादेशी व रोहिंग्यांची मालाड मालवणी परिसरात वाढती संख्या यामुळे तेथे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस विभागाने ता तात्काळ पावले उचलावीत, असे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

मालवणी परिसरातील सरकारी जमिनीवर करण्यात आलेले अतिक्रमण, त्यामुळे निर्माण झालेल्या सामाजिक समस्या तसेच त्यातून कायदा व सुव्यवस्थेची बिघडलेली अवस्था, यासर्व बाबींवर नियंत्रण मिळवण्यासाठी घुसखोरांविरोधात तात्काळ कारवाईचे आदेश पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

यावेळी उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी, महापालिकेचे उपायुक्त शंकर वार, किरण दिघावकर, डीसीपी झोन ११ चे विशाल ठाकूर,शिधा वाटप अधिकारी राहुल साळुंखे यावेळी उपस्थित होते.

हे ही वाचा:

‘या’ कारणामुळे ४० हजार कंपन्यांना लागणार टाळे

जे जे रुग्णालय परिसरात सापडले भुयार

उपमुख्यमंत्री विठुरायाचरणी! शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं जीवन सुजलाम सुफलाम व्हावं

‘आळशी माणूस ऑफ द इयर’ शोधायचा असेल तर मातोश्रीवर जा

 

मालवणी परिसरात अवैधरीत्या राहणाऱ्या रोहिंग्या व बांगलादेशी नागरिकांची माहिती मिळवण्यासाठी स्थापन केलेल्या समितीत आढावा घेण्यात आला आणि परिस्थितीची माहिती घेण्यात आली. सरकारी जमिनीवरील अवैध कब्जा, त्यातून निर्माण झालेल्या समस्या या भागातील अधिकृत नागरिकांना त्रासदायक ठरल्या आहेत. त्यामुळे बिघडलेली कायदा व सुव्यवस्था  नियंत्रणात आणणे आवश्यक आहे.

मुंबईच्या मालवणी भागात तिथल्या बहुसंख्य मुस्लिम नागरिकांकडून अल्पसंख्यांक हिंदू, दलित बांधवांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना जानेवारीत समोर आल्या होत्या. आमदार मंगल प्रभात लोढा आणि ‘न्यूज डंका’ ने पहिल्यापासूनच या हिंदूंच्या न्याय हक्कांसाठी मालवणी विषयाचा पाठपुरावा केला आहे. आमदार मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेतही या विषयाला वाचा फोडली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,950चाहतेआवड दर्शवा
1,976अनुयायीअनुकरण करा
52,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा