महायुतीचे सरकार सत्तेत येताच राज्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्याचे सत्र सुरू झाले आहे. मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांच्या सह राज्यातील ७ आयपीएस अधिकारी यांच्या बदल्याचा आदेश मंगळवारी काढण्यात आला.
मागील आठवड्यात ६ आयपीएस अधिकाऱ्यांचा बदल्या करण्यात आलेल्या होत्या,आणि मंगळवारी ७ अधिकाऱ्यांचा बदल्याचे आदेश गृहविभागाकडून काढण्यात आले आहेत.
मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांची रेल्वे आयुक्त पदावरून राज्य गुप्तवार्ता विभागात सहपोलिस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. महिला आयपीएस अधिकारी शारदा निकम यांची राज्य गुप्तवार्ता विभागातून अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स येथे विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.
नागपूर शहर सहपोलिस आयुक्त निस्सार तांबोळी यांची राज्य राखीव पोलीस विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.अमरावतीचे पोलीस आयुक्त एन.डी. रेड्डी यांची नागपूर शहर सहपोलिस आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
माजी राष्ट्रपती थायलंडला रवाना, बांगलादेशात वादळ!
‘मोदी अंकल’ तुम्ही माझे हिरो आहात!
परिणीती चोप्रा संतापल्या, काय म्हणाल्या ?
भारताचे उद्योग क्षेत्र ३ ट्रिलियन डॉलर संधी निर्माण करणार
केंद्रीय प्रतिनियुक्ती वर असलेल्या आयपीएस अधिकारी सुप्रिया पाटील-यादव यांना विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) महाराष्ट्र राज्य येथे बदली करण्यात आली आहे. राज्य राखीव पोलीस दलाचे विशेष पोलिस महानिरीक्षक राजीव जैन यांची सागरी सुरक्षा महाराष्ट्र राज्य विशेष पोलीस महानिरीक्षक पदी बदली करण्यात आली आहे. मुंबई नॉर्थ अप्पर पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमुखे यांची विशेष पोलिस महानिरीक्षक ‘प्रशासन’महाराष्ट्र राज्य पदी बदली करण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यात १)प्रभात कुमार – संचालक, नागरी संरक्षण ( महाराष्ट्र राज्य, मुंबई),२) प्रशांत बुरडे – पोलीस महासंचालक, लोहमार्ग ३) सुनिल रामानंद- अप्पर पोलिस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग ४) राजकुमार व्हटकर – अप्पर पोलिस महासंचालक (रा. रा. पोलिस बल) ५) के. एम. मल्लिकार्जुन – अप्पर पोलिस महासंचालक (प्रशिक्षण आणि खास पथके) ६) प्रवीण साळुंके – अप्पर पोलिस महासंचालक, महामार्ग सुरक्षा या सहा आयपीएस अधिकारी यांच्या बदल्या करण्यात आलेल्या होत्या. येत्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी यांच्या बदल्याचे आदेश येण्याची शक्यता एका जेष्ठ आयपीएस अधिकारी यांनी म्हटले आहे.
