हिंदू देवी देवतांची अश्लील छायाचित्रे तसेच अश्लील चित्रफिती तयार करून समाजमाध्यमावर पसरवून बदनामी करणाऱ्या विकृताला अखेर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपी हा आंध्रप्रदेशात राहणारा असून सनदी लेखापालच्या तिसर्या वर्षात शिकतोय. मागील एक वर्षापासून त्याने ६ बनावट ‘एक्स’ खाती तयार करून हिंदू देवी देवतांची बदनामी सुरू केली होती. समाजात तेढ निर्माण व्हावी या उद्देशाने तो हे कृत्य करत असल्याची बाब तपासात समोर आली आहे.
काही दिवसापासून विविध समाजमाध्यामांवर हिंदू देवी देवतांचे बदनामीकारक प्रतिमा तयार करून प्रसारित करण्यात येत होत्या. विकृत आरोपीने हिंदू देवतांच्या छायाचित्रांमध्ये फेरफार करून तयार केलेले अश्लील व्हिडीओ एक्स, फेसबुक,सोशल मीडिया तसेच अश्लील संकेतस्थळावर पसरवले होते. मागील एक वर्षांपासून हा प्रकार सुरू होता.
हिंदू देवी देवातांचे अशाप्रकारे विकृत स्वरूपातील चित्रण केल्याने संतापाची लाट पसरली होती. राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे तक्रार केली होती. मुख्यमंत्र्यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश दिले होते.
हे ही वाचा:
ऑपरेशन सिंदूरपासून प्रेरित होऊन १७ कुटुंबांनी नवजात मुलींचे नाव ठेवले ‘सिंदूर’
दहशतवाद्यांना घरात घुसून मारू, वाकड्या नजरेने पाहिलंत तर विध्वंस होईल!
वैज्ञानिकांचे कौतुक जग कान टवकारून का ऐकत होते?
आदमपूर एअरबेसला भेट देत पाकिस्तानचा ‘तो’ दावा मोदींनी ठरवला फोल
याप्रकरणी महाराष्ट्र सायबर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १९६, २९४, २९९ व माहिती तंत्रज्ञान (IT) कायदा, २००० च्या कलम ६७, ६७(अ) नुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता.सायबर पोलिसांनी या विकृताचा तपास कऱण्यासाठी तज्ञ अधिकार्यांचे विशेष पथक तयार केले होते.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून पोलिसांनी मध्य प्रदेशातील इंदोर येथून ३९ वर्षीय विकृताला अटक करण्यात आली आहे. तो वाणीज्य शाखेतील पदवीधर आहे. सध्या सनदी लेखापाल परिक्षेचा अभ्यास करतोय. बनावट एक्स प्रोफाइल च्या माध्यमातून त्याने हिंदू देवीचे अत्यंत आक्षेपार्ह डिजिटल सामग्रीचे प्रसारण केले होते. या मजकुराचा उद्देश सामाजिक असंतोष निर्माण करणे आणि धार्मिक भावना दुखावणे असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीला १३ मे २०२५ पर्यंत पोलीस कोठडीत आहे. विशेष म्हणजे आरोपीचे कुटुंबिय सामाजिक संघटनेत सक्रीय आहेत.
७ एक्स बनवाट खाती
याबाबत महाराष्ट्र सायबर पोलिसांनी सांगितले की आरोपी हा विकृत असून समाजात तेढ निर्माण व्हावी या उद्देशाने त्याने हे कृत्य केल्याचे प्रथमदर्शनी तपासात समोर आले आहे. यासाठी त्याने ७ एक्स खाते तयार केले होते. पकडले जाऊ नये यासाठी तो व्हीपीएनचा वापर करत होता. मात्र पोलिसांनी त्याचा आयपी ॲड्रेस मिळवून तपास केला आणि त्याच्या मुसक्या आवळल्या.
२०२१ पासून तो ‘एक्स’खाते वापरतोय. त्यामुळे आधी देखील त्याने असे प्रकार केले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मागील एक वर्षांपासून त्याने बनवाट एक्स खाती बनवून त्याद्वारे हिंदू देवीदेवतांची बदनामी सुरू केल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणात आणखी ४ आरोपी आहेत. ते वेगवेगळ्या राज्यातील आहेत त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
