भारतीय सेनादलाचे डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन राजीव घई यांच्या नेतृत्वाखाली काल-आज अशा दोन पत्रकार परिषदा झाल्या. नौदल, हवाई दलाचे प्रमुख अधिकारी या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते. या पत्रकार परिषदेमध्ये जे काही सांगण्यात आलं त्यातलं बरंच ‘बिटवीन द लाईन’ होतं, बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देणे सेनाधिकाऱ्यांनी टाळली. बरंच काही तज्ज्ञ वगळता अनेकांच्या डोक्यावरून गेलं. ते स्वाभाविक सुद्धा आहे. ज्यांना पत्रकार परिषदांचा आशय समजला नाही. त्यांना आजच्या पत्रकार परिषदेच्या सुरूवातीला स्क्रीनवर दिलेल्या राष्ट्र कवी दिनकर यांच्या काही पंक्ति, एअर मार्शल ए.के.भारती यांनी उद्धृत केलेल्या रामचरीतमानसच्या पक्तिं तसेच आज इंडियन आर्मी ने एक्सवर अपलोड केलेला व्हिडिओ तरी पाहून घ्यावा याच्यामध्ये शिवतांडव स्तोत्राची धून आहे. पाकिस्तानात जे काही घडले आहे, त्याचा भावार्थ लक्षात येऊ शकेल.
